*रायपाटण येथे सेवा सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रायपाटण येथे सेवा सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*
*रायपाटण येथे सेवा सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*
राजापूर(प्रतिनिधी):-जिजामाता विद्या मंदिर रायपाटण येथे रायपाटण मधील पाच प्राथमिक शाळा आणि जिजामाता विद्या मंदिर रायपाटणच्या विद्यार्थ्यांना राजापूर तालुका भारतीय जनता पक्षा कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी उपसभापती आणि जिल्हा सरचिटणीस अभिजीत गुरव तसेच तालुका अध्यक्ष पूर्व मंडल एकनाथ मोंडे, पश्चिम मंडल अध्यक्ष मोहन घुमे माजी तालुकाध्यक्ष भास्कर सुतार माजी तालुका उपाध्यक्ष आणि रायपाटण भारतीय जनता पक्षाचे मनोज गांगण भाजप पदाधिकारी अमर वारीसे
रायपाटण माजी सरपंच संदीप कोलते, राजेश नलावडे, महेंद्र गांगण, माजी उपसरपंच विजय जड्यार, बुथ अध्यक्ष संदीप नेवरेकर, भाजप कार्यकर्ते रामदास गांगण, विशाल गांगण, शंकर गांगण विद्यार्थी व पाल बहुसंख्येने उपस्थित होते.
उपसभापती यांनी सेवा सप्ताहाचा हेतू विशद करून विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. यावेळी तालुका अध्यक्ष एकनाथ मोंडे, मनोज गांगण यांनी आपले विचार व्यक्त केले. शेवटी संदीप कोलते यांनी भारतीय जनता पक्षाचे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे, शिक्षक विद्यार्थी व पालकांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.



