*लोकसहभागातून त्रिशूळ येथे वनराई बंधारा पूर्ण; मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते जलपूजन, ‘सेवा संकल्प अभियान 2026’अंतर्गत श्रमदानातून जलसंधारणाला चालना*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लोकसहभागातून त्रिशूळ येथे वनराई बंधारा पूर्ण; मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते जलपूजन, ‘सेवा संकल्प अभियान 2026’अंतर्गत श्रमदानातून जलसंधारणाला चालना*
*लोकसहभागातून त्रिशूळ येथे वनराई बंधारा पूर्ण; मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते जलपूजन, ‘सेवा संकल्प अभियान 2026’अंतर्गत श्रमदानातून जलसंधारणाला चालना*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाला चालना देऊन पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान 2026’ अंतर्गत धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत त्रिशूळ येथे ग्रामस्थांच्या लोकसहभागातून आणि श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. या बंधाऱ्याचे जलपूजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकसहभागातून जलसंधारणाचा उपक्रम
ग्रामपंचायत त्रिशूळ येथील ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेने एकत्र येत श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी केली. पावसाचे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर उपयोग करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणी साठवणुकीस मदत होऊन भूजल पुनर्भरणाला चालना मिळणार आहे. जलपूजनानंतर गोयल यांनी वनराई बंधाऱ्याची पाहणी करून त्याच्या साठवण क्षमतेविषयी आणि कामाच्या स्वरूपाविषयी माहिती घेतली. लोकसहभाग आणि श्रमदानातून जलसंधारणाचे काम पूर्ण केल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
जलसंधारणाच्या कामांमध्ये ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून, स्थानिक पातळीवर सामूहिक प्रयत्नांतून पाण्याचे संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व या उपक्रमातून अधोरेखित झाले.
यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ तसेच विविध विभागांचे क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.