*मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची प्राथमिक आरोग्य केंद्र राजबर्डी येथे पाहणी,सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य सेवांचा घेतला आढावा,दर्जेदार आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवà
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची प्राथमिक आरोग्य केंद्र राजबर्डी येथे पाहणी,सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य सेवांचा घेतला आढावा,दर्जेदार आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवà
*मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची प्राथमिक आरोग्य केंद्र राजबर्डी येथे पाहणी,सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य सेवांचा घेतला आढावा,दर्जेदार आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी धडगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, राजबर्डी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा तसेच नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. सेवा संकल्प अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आणि उपचारात्मक सेवांची माहिती त्यांनी घेतली. यावेळी प्रसूतीगृह, शस्त्रक्रियागृह, लस साठवणुकीसाठी असलेला शीतसाखळी कक्ष आणि औषध भांडार या महत्त्वाच्या कक्षांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या कक्षांमधील स्वच्छता, औषधांचा उपलब्ध साठा तसेच रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची त्यांनी तपासणी केली.
दर्जेदार आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश दिले.
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य केंद्रामार्फत पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवांचा आढावा घेताना, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने काम करून नागरिकांना वेळेत व आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात असे सांगितले, या पाहणी दौऱ्याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र, राजबर्डी येथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच आरोग्य यंत्रणेतील विविध क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



