*शिवसेनेचे रूपेश कदम यांनी जपली सामाजिक बांधिलकी ‘रास गरबा’ साध्या पद्धतीने साजरा करत केली दुष्काळग्रस्तांना मदत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिवसेनेचे रूपेश कदम यांनी जपली सामाजिक बांधिलकी ‘रास गरबा’ साध्या पद्धतीने साजरा करत केली दुष्काळग्रस्तांना मदत*
*शिवसेनेचे रूपेश कदम यांनी जपली सामाजिक बांधिलकी ‘रास गरबा’ साध्या पद्धतीने साजरा करत केली दुष्काळग्रस्तांना मदत*
मुंबई(प्रतिनिधी):-महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांच्या परिस्थितीची जाणीव ठेवत शिवसेनेचे रूपेश कदम यांनी यंदाचा ‘रास गरबा उत्सव’ साध्या पद्धतीने साजरा करण्याचा सामाजिक निर्णय घेतला आहे. उत्सवावर होणारा उर्वरित खर्च दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा संकल्प त्यांनी यावर्षी केला आहे. याच सामाजिक जाणिवेतून रूपेश कदम यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे 1 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला."शिवसेना रूपेश श्याम कदम फाउंडेशन"च्या माध्यमातून मुंबईतील मालाड पूर्व कुरार परिसरात वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या उपक्रमांतून फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जपत आहे. तसेच, कुरारची माता राणीचा भव्य देवी उत्सवही फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केला जातो. या फाउंडेशनचा ‘रास गरबा उत्सव’ मुंबईत प्रसिद्ध असून, या उत्सवाला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक, तरुणाई, सेलिब्रिटी तसेच सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहतात. यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत कोरडा दुष्काळ पडला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याऐवजी त्यावरील खर्च दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्याचा संवेदनशील निर्णय रूपेश कदम यांनी घेतला. उत्सवाचा आनंद साजरा करण्यापेक्षा संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना मदतीचा हात देणे महत्त्वाचे असल्याची सामाजिक जाणीव त्यांच्या या निर्णयातून दिसून येते. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
कुरारच्या माता राणीच्या आशीर्वादाने राज्यावरील दुष्काळाचे संकट लवकर दूर व्हावे, शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या जीवनात पुन्हा सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना रूपेश कदम यांनी यावेळी देवीच्या चरणी केली.



