ताजा खबरे:
*शिवसेनेचे रूपेश कदम यांनी जपली सामाजिक बांधिलकी ‘रास गरबा’ साध्या पद्धतीने साजरा करत केली दुष्काळग्रस्तांना मदत*
*देवरे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन*
*दादर टिळक भवन येथे 17 ऑक्टोबर रोजी 'समतेचा गरबा'*
*विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेची पुन्हा मोर्चे बांधणी सुरु*
*पाचल बीटची शैक्षणिक गुणवत्तेत भरारी, पाचल बौद्धवाडी व रायपाटण नं.1 शाळांचे गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांच्याकडून कौतुक*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पाचल बीटची शैक्षणिक गुणवत्तेत भरारी, पाचल बौद्धवाडी व रायपाटण नं.1 शाळांचे गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांच्याकडून कौतुक*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पाचल बीटची शैक्षणिक गुणवत्तेत भरारी, पाचल बौद्धवाडी व रायपाटण नं.1 शाळांचे गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांच्याकडून कौतुक*

  • Share:

*पाचल बीटची शैक्षणिक गुणवत्तेत भरारी, पाचल बौद्धवाडी व रायपाटण नं.1 शाळांचे गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांच्याकडून कौतुक*
राजापूर(प्रतिनिधी):-पाचल बौद्धवाडी आणि रायपाटण नं.1 या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता कौतुकास्पद असून, पाचल बीटने शैक्षणिक गुणवत्तेच्या क्षेत्रात राजापूर तालुक्यात आघाडी घेतली आहे, असे गौरवोद्गार राजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांनी काढले. पाचल येथे आयोजित प्रभागस्तरीय शिक्षण परिषदेत ते बोलत होते. राजापूर तालुका शिष्यवृत्ती अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याची जबाबदारी शिक्षकांची असून, ती जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडणे आवश्यक आहे, असे भोसले यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्नशील राहावे. शिष्यवृत्ती परीक्षेतील यशासाठी नियमित सराव, योग्य मार्गदर्शन आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे महत्त्वाचे आहे. शिक्षकांनी आपल्या अध्यापन कौशल्यात सातत्याने सुधारणा करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी मेहनत घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांना मार्गदर्शन करताना भोसले यांनी, शिक्षकांनी आपल्या कार्यातून शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. पाचल बीटमधील शाळांनी गुणवत्तेच्या क्षेत्रात मिळविलेली आघाडी कायम ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अधिक प्रभावीपणे काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
    परिषदेत ‘मूल्यवर्धन उजळणी’ या विषयावर धुळे सर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया अधिक परिणामकारक बनविण्यासाठी उजळणीचे महत्त्व आणि त्यासाठी शिक्षकांनी करावयाचे नियोजन याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच ‘स्पर्श’ या विषयावर बिर्जे यांनी मार्गदर्शन केले. या विषयाच्या माध्यमातून संबंधित शैक्षणिक बाबींचे महत्त्व स्पष्ट करून शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.
परिषदेत आदर्श पाठाचे सादरीकरण परितकर यांनी अत्यंत सुंदर आणि प्रभावी पद्धतीने केले. त्यांच्या अध्यापनातील नियोजन, विषयाची मांडणी आणि विद्यार्थ्यांना विषय समजावून सांगण्याच्या पद्धतीचे उपस्थितांनी कौतुक केले. या आदर्श पाठाच्या माध्यमातून शिक्षकांना प्रभावी अध्यापन पद्धतींचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. या प्रभागस्तरीय शिक्षण परिषदेत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, शिष्यवृत्ती अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, मूल्यवर्धन उजळणी आणि नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत आणि शाळांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असा संदेश या परिषदेतून देण्यात आला. पाचल बीटमधील शाळांनी शैक्षणिक गुणवत्तेच्या क्षेत्रात मिळविलेली आघाडी ही शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आणि शैक्षणिक उपक्रमांचे फलित असल्याचे या परिषदेतून अधोरेखित झाले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांना प्रेरणा देणारी ही प्रभागस्तरीय शिक्षण परिषद उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शिवसेनेचे रूपेश कदम यांनी जपली सामाजिक बांधिलकी ‘रास गरबा’ साध्या पद्धतीने साजरा करत केली दुष्काळग्रस्तांना मदत*
October, 15 2026
*देवरे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन*
October, 15 2026
*दादर टिळक भवन येथे 17 ऑक्टोबर रोजी 'समतेचा गरबा'*
October, 15 2026
*विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेची पुन्हा मोर्चे बांधणी सुरु*
October, 15 2026
*पाचल बीटची शैक्षणिक गुणवत्तेत भरारी, पाचल बौद्धवाडी व रायपाटण नं.1 शाळांचे गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांच्याकडून कौतुक*
October, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज