*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन*
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन*
मुंबई(प्रतिनिधी):-घटनात्मक पदावर राहून सलग पंचवीस वर्षे यशस्वीरित्या जनसेवा केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला ठराव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्रीगण यांच्याकडून टाळ्यांच्या गजरात ठरावाचे स्वागत, शासकीय मालकीच्या छोट्या, स्वतंत्ररीत्या बांधकामास अयोग्य, चिंचोळ्या आकाराच्या, उपयुक्त आकार नसलेल्या, पोहोच मार्ग नसलेल्या भूखंडांच्या वितरणाच्या धोरणात सुधारणा करण्यास मंजुरी. महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, 1971 च्या नियम 37 व 37 अ मधील तरतुदीत सुधारणा होणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)
श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगांव यांना मौजे गिरडा (ता. व जि. बुलढाणा) येथील यात्रास्थळ विकासासाठी कायमस्वरूपी बांधकाम करण्यास मंजुरी. संस्थानाला यापुर्वीच वृक्षलागवडीसाठी दिलेल्या 19 हेक्टर 6 आर. जमिनीपैकी 3 हेक्टर 81 आर जमिनीवर बांधकाम करता येणार. यामुळे भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देता येणार.



