*जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत के.आर.पब्लिक स्कूलचे यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत के.आर.पब्लिक स्कूलचे यश*
*जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत के.आर.पब्लिक स्कूलचे यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली. 14 वर्षांखालील मुले-मुली तसेच 17 व 19 वर्षांखालील मुले- मुलींच्या गटांत विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले. विभागीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे 14 वर्षा खालील मुले सार्थक सोनार, यश पाटील, हन्वीक हुरेज, 17 वर्षा खालील मुले नरेंद्र साबळे , 17 वर्षा खालील मुली मोक्षा लोढा, 19 वर्षा खालील मुले गुरुवेश पाटील, नक्ष पाडवी, 19 वर्षा खालील मुली गार्गी सिध्दार्थ वाणी.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणी, उपाध्यक्ष सिद्धार्थ वाणी, प्राचार्या डॉ. छाया शर्मा, उपप्राचार्य, योगासन प्रशिक्षक योगेश बेदरकर, निशांक दिवाकर, रोहित महाले तसेच कर्मचारीवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



