*सेवा संकल्प अभियानांतर्गत तळोदा तालुक्यात 330 वैयक्तिक वनहक्क दाव्यांची सुनावणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सेवा संकल्प अभियानांतर्गत तळोदा तालुक्यात 330 वैयक्तिक वनहक्क दाव्यांची सुनावणी*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत तळोदा तालुक्यात 330 वैयक्तिक वनहक्क दाव्यांची सुनावणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सेवा संकल्प अभियानांतर्गत तळोदा तालुक्यातील 330 वैयक्तिक वनहक्क दावेदारांच्या प्रकरणांची सुनावणी घेण्यात आली. यावेळी संबंधित दाव्यांची तपासणी व पडताळणी करून पात्रता निश्चित करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली.
जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सुनावणीस समितीचे सदस्य सचिव तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी देवेंद्र पाटील, वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक (ACF) पवार आणि रोशन बुवा उपस्थित होते. वनहक्क कायद्यांतर्गत पात्र दावेदारांना त्यांच्या हक्कांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनामार्फत दाव्यांची पारदर्शकपणे तपासणी व पडताळणी करण्यात येत आहे. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आदिवासी नागरिकांच्या वनहक्कविषयक प्रश्नांचे निराकरण करून त्यांना शासनाच्या विविध योजना व सुविधांचा लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात येत आहे. शासनाच्या सेवा आणि विविध हक्क पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शासन व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्यासाठी सेवा संकल्प अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.



