*देवाचे गोठणेतील बा.ल.साठे विद्यालयाची तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत दमदार कामगिरी,चार खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवाचे गोठणेतील बा.ल.साठे विद्यालयाची तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत दमदार कामगिरी,चार खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड*
*देवाचे गोठणेतील बा.ल.साठे विद्यालयाची तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत दमदार कामगिरी,चार खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड*
राजापूर(प्रतिनिधी):-राजापूर तालुका तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा सन 2026-27 दिनांक 5 व 6 ऑक्टोबर 2026 रोजी उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत बा. ल. साठे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, देवाचे गोठणे येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली.
विजेत्या खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी 19 वर्षे वयोगट कुमार दुर्गेश संजय नाटेकर प्रथम क्रमांक
उंच उडी, लांब उडी, तनिष्क भिकाजी मल्हार द्वितीय क्रमांक, उंच उडी
वर्षे वयोगट- कुमार निहार नितीन नवाळे प्रथम क्रमांक 100 मीटर धावणे,
विराज विलास आंबेकर द्वितीय क्रमांक 100 मीटर धावणे, या चारही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे चारही खेळाडूंची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या यशासाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक महाले यांचे मार्गदर्शन लाभले, तर क्रीडा मार्गदर्शक लाड सर यांनी विशेष मेहनत घेतली.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.