*अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई, राज्यभरात प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम, 79 कोटी 29 लाखांचा साठा व 3 वाहने जप्त, एकूण मुद्देमाल 1.9 कोटी 12 एफ.आय.आर. दाखल,1
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई, राज्यभरात प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम, 79 कोटी 29 लाखांचा साठा व 3 वाहने जप्त, एकूण मुद्देमाल 1.9 कोटी 12 एफ.आय.आर. दाखल,1
*अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई, राज्यभरात प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम, 79 कोटी 29 लाखांचा साठा व 3 वाहने जप्त, एकूण मुद्देमाल 1.9 कोटी 12 एफ.आय.आर. दाखल,13 जणांना अटक*
मुंबई(प्रतिनिधी):-अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई, संशयित निकृष्ट, भेसळयुक्त व चुकीच्या लेबलिंगचे अन्नपदार्थ कारवाईत कोकण, पुणे, नागपूर व अमरावती विभागांत 53,726 किलो अन्नसाठा व 6,098 लिटर दूध/ताडीवर कारवाई; साठ्याची एकूण किंमत 1.39 कोटी, सुपारी, दूध, पनीर, भगर, फरसाण, ताडी व सोयाबीन तेलाचा समावेश मुंबईतील 10 अन्न आस्थापनांचे (हॉटेल / रेस्टॉरंट इ. चे) परवाने निलंबन. प्रतिबंधित अन्नपदार्थांवरील कारवाई, नाशिक विभागात प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात मोठी कारवाई; 92.71 लाखांचा मुद्देमाल जप्त
अन्न व औषध प्रशासनामार्फत प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतूक रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. दिनांक 6 ते 8 ऑक्टोबर 2026 या कालावधीत जळगाव, धुळे व नाशिक येथे करण्यात आलेल्या कारवाईत 4 आस्थापनांची तपासणी करून 23 लक्ष 24 हजार 217 किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणांमध्ये 4 एफ.आय.आर. दाखल करण्यात आले असून, 5 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच, 2 आस्थापने सील करण्यात आली असून, 2 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
दिनांक 8 ऑक्टोबर 2026 रोजी नंदुरबार येथे गोपनीय माहितीच्या आधारे प्रतिबंधित विमल पान मसाला व V-1 तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनावर (MH 48 DQ 6042) कारवाई करून 39 लाग 47 हजार 150 किमतीचा साठा व अंदाजे 30 लक्ष किमतीचे वाहन, असा एकूण
69 लक्ष 47 हजार 150 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला व नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सुरक्षित ठेवण्यात आला, अन्न व औषध प्रशासनाची कोकण विभागात कारवाई;10.88 लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त
दिनांक 8 ऑक्टोबर 2026 रोजी कोकण विभागात 3 आस्थापनांच्या तपासणीत
10 लक्ष 88 हजार 578 किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. 3 एफ.आय.आर. दाखल, 3 व्यक्तींना अटक व 3 खटले दाखल करण्यात आले आहेत. पुणे विभागात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त
दिनांक 8 ऑक्टोबर 2026 रोजी पुणे विभागात 1 आस्थापनाच्या तपासणीत 4005 किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. 1 एफ. आय. आर. व 1 खटला दाखल करण्यात आला असून 1 व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाची छत्रपती संभाजीनगर विभागात कारवाई;4.41 लाखांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त
दिनांक 6 व 7 ऑक्टोबर 2026 रोजी 2 आस्थापनांच्या तपासणीत 4,40, 846 किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. 2 एफ. आय.आर. दाखल करण्यात आले असून 2 व्यक्तींना
अटक करण्यात आली आहे. नागपूर विभागात प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 1.24 लाखांचा साठा जप्त, 2 व्यक्तींना अटक दिनांक 6 ते 8 ऑक्टोबर 2026 रोजी 2 आस्थापनांच्या तपासणीत 1,24, 110 किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. 2 एफ. आय.आर. दाखल करण्यात आले असून 2 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. हॉटेल / रेस्टॉरंट / धाबा / क्लब / बेकरी इ. वरती कारवाई (परवाने निलंबन) मुंबई विभागातील 10 आस्थापनांवर कारवाई करून त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत: कारणे खालीलप्रमाणे परवाना/नोंदणी तुटी: FSSAI परवाना किंवा नोंदणी नसणे, चुकीच्या प्रकारचा परवाना असणे, किंवा परवाना दर्शनी भागात न लावणे. कामगारांची स्वच्छता व कागदपत्रेः कामगारांकडे हातमोजे, हेडगियर व अॅप्रन नव्हते; वैद्यकीय प्रमाणपत्र व FoSTaC प्रशिक्षण उपलब्ध नव्हते.
अस्वच्छ परिसरः भिंती, छत व फरशा अस्वच्छ किंवा तुटलेल्या होत्या; स्वच्छता वेळापत्रक व
निर्जंतुकीकरण नव्हते. कीटक व पेस्ट कंट्रोलः उंदीर, झुरळे व माशा आढळल्या; पेस्ट कंट्रोलचे रेकॉर्ड किंवा उपाययोजना नव्हत्या. अन्न साठवणूक व तापमान: रेफ्रिजरेशन व तापमान निरीक्षण अपुरे होते; FIFO/FEFO पाळले जात नव्हते; कच्चे-शिजवलेले व शाकाहारी -मांसाहारी अन्न वेगळे ठेवले नव्हते.1 मे. हुमा केटरर इस्लाम जिमखाना आत, 75-ए, नेताजी सुभाषचंद्र बोस रोड, मुंबई -400020. मे. मिल्कौज डेअरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. कॅप्टसिंग कंपाउंड, सिंह इस्टेट, कांदिवली (पूर्व), मुंबई - 400101. मे. ला पिनोझ पिझ्झा दुकान क्र. 03, केशव कुंज, लिंकिंग रोड, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई.
मे. एफ 3 कॉर्पोरेट हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस प्रा. लि. डी. जे. संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई - 400056.
मे. नारायण डोसा - दुकान क्र. 2, पारस सेंटर, ऑपेरा हाऊस, चरणी रोड, मुंबई - 4000004. मे. अब्रार माईकू खान सी/ओ अब्रार किराणा स्टोअर दुकान क्र. 4, गंगाराम सकपाळ मार्ग, जे. जे. हॉस्पिटल, मुंबई - 400011. मे. गोल्डन स्टार रेस्टॉरंट 2, सकीना मंझिल, राजा राममोहन रॉय मार्ग, चरणी रोड, गिरगाव, मुंबई - 40004. मे. सेंट्रल कॅन्टीन - जे. जे. हॉस्पिटल परिसर, डॉ. आंबेडकर रोड, भायखळा, मुंबई- 40008. मे. पालीवाल डेअरी / रोहित खेतावत आरडीपी 7, ए विंग, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई - 400067. मे. नवाब ज्यूस सेंटर इस्लाम जिमखाना, मरीन लाइन्स स्टेशन, नेताजी सुभाषचंद्र बोस रोड, मुंबई - 40002. इतर अन्नपदार्थांवरील कारवाई (निकृष्ट, भेसळ व लेबलिंग उल्लंघनाबाबत) कोकण विभागात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; निकृष्ट व चुकीचे लेबलिंग असलेल्या अन्नपदार्थांवर कारवाई M/s. Uma Exports Ltd., तुर्भे MIDC, नवी मुंबई, सुपारी (Areca Nuts) निकृष्ट दर्जाची असल्याचा संशय तसेच पॅकेजिंग/लेबलिंग व अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम 23, 26 व 27 चे उल्लंघन आढळल्याने 52016 किलो साठ्यावर (किंमत 1,33,16,096) कारवाई करण्यात आली. M/s. Shri Yog Dairy, नांगलवाडी फाटा, ता. महाड, जि. रायगड (7.10. 2026): गायीचे सैल दूध 40 किलो (2000) व म्हशीचे सैल दूध 35 किलो (2450) तपासणीसाठी घेतले; दूध निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय. M/s. Sawariya Milk and Milk Product, तळोजा MIDC, ता. पनवेल, जि. रायगड (9.10. 2026): कच्चे शीतित गायीचे दूध 3998 लिटर (1, 95,902) व म्हशीचे दूध 598 लिटर (41,860) यावर चुकीचे लेबलिंग व कलम 23, 26 व 27 च्या उल्लंघनाबद्दल कारवाई. M/s. Mateshwari Foods, बालाजी इंडस्ट्रियल पार्क, तळोजा MIDC, ता. पनवेल, जि. रायगडः लो-फॅट पनीर (119 किलो, 30,940) च्या लेबलिंग मधील तुटी व कलम 23, 26 व 27 च्या उल्लंघनाबद्दल कारवाई. पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; फरसाण, दूध व ताडीच्या साठ्यावर कारवाई,
M/s. Aaimata Farsan and Wafers, आंबेगाव, धनकवडी, पुणे :
दर्जाच्या संशयावरून कारवाई. Sp. Kaka Tikha Farsan चा 215 किलो साठा (55, 900) लेबलिंग उल्लंघन व निकृष्ट
M/s. Shiv Sahyadri Milk Sankalan and Shitakaran Kendra, कवठे येमाई, ता. शिरूर, जि.पुणे -412218 :
1484 लिटर दूध (62,328) आम्लता चाचणीत सकारात्मक आढळल्याने कायद्याच्या कलम 26 व 27 अंतर्गत कार्यवाही. M/s. Dafalapur Taddy Shop, हॉटेल प्रीतम परमिट रूम अँड बारच्या मागे, दफळापूर, ता. जत, जि. सांगली :
18लिटर ताडी (1900) निकृष्ट/असुरक्षित असल्याच्या संशयावरून कार्यवाही, नागपूर विभागात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 69,940 किमतीचा 538 किलो भगरीचा साठा जप्त, दिनांक 8 ऑक्टोबर 2026 रोजी M/s. Ishwardas Kirana Bhandar, इतवारी, नागपूर येथे भगरीच्या पॅकेजिंग व लेबलिंग नियमांचे उल्लंघन आढळल्याने 538 किलो साठ्यावर (169,940) कारवाई करण्यात आली, अमरावती विभागात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; भेसळीच्या संशयावरून 11,36,900 किमतीचे 763.40 किलो सोयाबीन तेल जप्त, दिनांक 8 ऑक्टोबर 2026 रोजी M/s. Oshiyaji Industries, वणी येथे भेसळीच्या संशयावरून 763.40 किलो पॅकबंद रिफाइंड सोयाबीन तेल (136,900) जप्त करण्यात आले.
अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत तक्रार नोंदणीसाठीः
अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत अथवा गैरप्रकाराबाबत तक्रारीसाठी टोल-फ्री क्रमांक 1800222365 तसेच Food & Drug Grievance Portal (https://complaints.mahafda.in) वर संपर्क साधावा. तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य



