*संभाव्य भीषण पाणीटंचाईच्या नियोजनासाठी आमदार आमश्या पाडवींची आढावा बैठक, काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवा, पाणीटंचाईच्या बैठकीत कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचे कडक आदेश,अक्राणी- अà¤
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*संभाव्य भीषण पाणीटंचाईच्या नियोजनासाठी आमदार आमश्या पाडवींची आढावा बैठक, काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवा, पाणीटंचाईच्या बैठकीत कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचे कडक आदेश,अक्राणी- अà¤
*संभाव्य भीषण पाणीटंचाईच्या नियोजनासाठी आमदार आमश्या पाडवींची आढावा बैठक, काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवा, पाणीटंचाईच्या बैठकीत कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचे कडक आदेश,अक्राणी- अक्कलकुवा तालुक्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची पूर्वतयारी, हलगर्जीपणा खपवून घेणार नाही आमदार आमश्या पाडवींचा अधिकाऱ्यांना सज्जड दम*
धडगाव(प्रतिनिधी):-येणाऱ्या काळातील संभाव्य भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी अक्राणी आणि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांनी प्रशासनाची आढावा बैठक घेतली. धडगाव येथील ठकार महाविद्यालयातील बिरसा मुंडा सामाजिक सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी पाणीपुरवठा आणि उपाययोजनांबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आमदार पाडवी यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, जे काम करणार नाहीत त्यांना थेट घरी बसवा,अशा शब्दांत कारवाईचे कडक आदेश दिले आहेत. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या अक्राणी आणि अक्कलकुवा तालुक्यांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत दरवर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. यावर्षीच्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आतापासूनच योग्य नियोजन करावे, या उद्देशाने या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जलस्रोतांचा घेतला सविस्तर आढावा या बैठकीत दुर्गम भागातील बोअरवेल, विहिरी आणि इतर सर्व नैसर्गिक व कृत्रिम जलस्रोतांच्या सद्यस्थितीची सविस्तर माहिती घेण्यात आली. आगामी काळात निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि दुर्गम भागातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, यावर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यात आला. बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
महिला सक्षमीकरण सक्षमीकरणासाठी कृषी कार्यालायामार्फत नोंदणी जास्तीत जास्त व्हायला पाहिजे नोंदणीत हलगर्जीपणा केला हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सुद्धा कडक कारवाई करण्यात येईल गंभीर आणि संवेदनशील प्रश्नावर काम करताना प्रशासकीय पातळीवर कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,अशी स्पष्ट भूमिका आमदार आमश्या पाडवी यांनी मांडली. लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा,असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. आढावा बैठकीला शिवसेनेचे नेते विजयसिंग पराडके, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके, धडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा, प्रा डॉ. दिनेश खरात, अक्राणीचे तहसीलदार मनोजकुमार ऐतवाडे, गटविकास अधिकारी पूजा गायकवाड, तालुका प्रमुख संदीप वळवी, शिवसेना शिंदे गट युवा जिल्हाप्रमुख योगेश पाटील, आणि नगरसेवक राकेश पावरा, माजी उपसभापती भाईदास अत्रे, ललित जगदाळे, पंचायत समिती सदस्य दिलीप पाडवी, उपनगराध्यक्ष राजेंद्र पावरा, सोशल मीडिया प्रमुख हुजेफा बलोच, यांच्यासह महसूल व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. अक्राणी आणि अक्कलकुवा तालुक्यातील माझ्या जनतेला उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच सतर्क राहून नियोजन करणे गरजेचे आहे. लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर जो अधिकारी किंवा कर्मचारी हलगर्जीपणा करेल, त्याची गय केली जाणार नाही. कामचुकार अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करून त्यांना घरी बसवण्याचे आदेश मी दिले आहेत. जनतेला सुरळीत पाणीपुरवठा करणे हेच आमचे प्राधान्य आहे.
आमश्या पाडवी, आमदार अक्राणी अक्कलकुवा विधानसभा.



