*अंगणवाडी केंद्र बिलगाव आडीखुडीपाडा येथे,‘सेवा संकल्प’ उपक्रमांतर्गत माता-बाल आरोग्य व पोषणाबाबत मार्गदर्शन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अंगणवाडी केंद्र बिलगाव आडीखुडीपाडा येथे,‘सेवा संकल्प’ उपक्रमांतर्गत माता-बाल आरोग्य व पोषणाबाबत मार्गदर्शन*
*अंगणवाडी केंद्र बिलगाव आडीखुडीपाडा येथे,‘सेवा संकल्प’ उपक्रमांतर्गत माता-बाल आरोग्य व पोषणाबाबत मार्गदर्शन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-ग्रामीण भागातील महिला, माता व बालकांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने अंगणवाडी केंद्र बिलगाव आडीखुडीपाडा येथे ‘सेवा संकल्प’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात माता- बाल आरोग्य, नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण, संतुलित पोषण आहार, कुपोषण प्रतिबंध, वैयक्तिक स्वच्छता, संसर्गजन्य आजारांपासून बचाव आणि किशोरवयीन आरोग्य याबाबत उपस्थित महिला व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती देण्यात आली. अंगणवाडी केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा योग्य वापर, बालकांच्या शारीरिक व मानसिक वाढीचे निरीक्षण आणि दैनंदिन आरोग्याची काळजी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य विभाग, अंगणवाडी विभाग व स्थानिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.