*अणसुरे भराडेवाडी दिवाबत्तीने उजळली ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने,स्वखर्चातून एकजूटीतून लिहिला नवा अध्याय*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अणसुरे भराडेवाडी दिवाबत्तीने उजळली ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने,स्वखर्चातून एकजूटीतून लिहिला नवा अध्याय*
*अणसुरे भराडेवाडी दिवाबत्तीने उजळली ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने,स्वखर्चातून एकजूटीतून लिहिला नवा अध्याय*
राजापूर(प्रतिनिधी):-आपलं गाव म्हणजे केवळ घरांचा समूह नाही, तर आपली माणसं, आपली नाती, आपली संस्कृती आणि आपल्या मातीशी जोडलेली आपली भावना आहे. असेच भराडेवाडीला प्रकाशमय करण्याचे एक छोटेसे स्वप्न येथील ग्रामस्थांनी मनात रंगवले. या उपक्रमासाठी कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता, “आपल्या गावासाठी आपणच काहीतरी करूया” या भावनेतून गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. आपल्या स्वखर्चातून सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्तीची व्यवस्था करून संपूर्ण वाडी प्रकाशमय करण्याचा संकल्प करण्यात आला.
हा उपक्रम केवळ दिवे आणि विद्युत खांब उभारण्याचा विषय नाही. हा आपल्या गावाबद्दलच्या प्रेमाचा, एकजुटीचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रकाश आहे. आज एखाद्या छोट्याशा वाडीतील काही माणसं एकत्र येऊन आपल्या परिसरासाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यातून इतरांसाठीही एक सुंदर संदेश निर्माण होतो “सरकार काय करेल?” याची वाट पाहण्यापेक्षा
“आपण आपल्या गावासाठी काय करू शकतो?” हा विचार महत्त्वाचा आहे. या उपक्रमामध्ये प्रत्येक घराचा, प्रत्येक कुटुंबाचा आणि प्रत्येक नागरिकाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा आहे. कारण गावाचा विकास हा केवळ काही व्यक्तींची जबाबदारी नसून संपूर्ण गावाची सामूहिक जबाबदारी आहे.
आज आपण आपल्या वाडीतील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे उजळण्याचे स्वप्न पाहत आहोत. उद्या याच एकजुटीतून शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण, पाणी, आरोग्य आणि इतर अनेक सामाजिक उपक्रम उभे राहू शकतात.
एका दिव्याने अंधार दूर होतो; पण अनेक माणसं एकत्र आली तर संपूर्ण गाव उजळून निघते.
भराडेवाडीचा हा छोटासा प्रयत्न इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरावा हीच अपेक्षा
“प्रकाश फक्त रस्त्यावरचा नसावा,
तो प्रत्येकाच्या मनातही निर्माण व्हावा.” भराडे वाडीतील ग्रामस्थांनी
स्वखर्चातून, स्वयंस्फूर्तीने स्वाभिमानाने आणि परस्परातील सहकार्याने लिहीलेला हा अध्याय भावी पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.



