*प्रवक्ता अकॅडमीच्या नॅशनल लेव्हल स्पीकिंग कॉम्पिटिशनचा नवसारीत भव्य सोहळा 3500 विद्यार्थ्यांमधून नंदुरबारच्या तेजस्विनी बेहरेने मारली बाजी,पटकावली 'इलेक्ट्रिक स्कुटी'*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रवक्ता अकॅडमीच्या नॅशनल लेव्हल स्पीकिंग कॉम्पिटिशनचा नवसारीत भव्य सोहळा 3500 विद्यार्थ्यांमधून नंदुरबारच्या तेजस्विनी बेहरेने मारली बाजी,पटकावली 'इलेक्ट्रिक स्कुटी'*
*प्रवक्ता अकॅडमीच्या नॅशनल लेव्हल स्पीकिंग कॉम्पिटिशनचा नवसारीत भव्य सोहळा 3500 विद्यार्थ्यांमधून नंदुरबारच्या तेजस्विनी बेहरेने मारली बाजी,पटकावली 'इलेक्ट्रिक स्कुटी'*
नवसारी(प्रतिनिधी):-‘प्रवक्ता अकॅडमी’च्या वतीने 2 ऑक्टोबर रोजी नवसारी येथे आयोजित भव्य ‘नॅशनल लेव्हल स्पीकिंग कॉम्पिटिशन’ अतिशय उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली. देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या 3500 हून अधिक विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादामुळे ही स्पर्धा विशेष लक्षवेधी ठरली.
कडक निकषांवर आधारित पहिल्या दोन फेऱ्यांमधून निवडलेल्या 50 उत्कृष्ट वक्त्यांमध्ये अंतिम फेरीत रंगलेल्या अटीतटीच्या स्पर्धेतून अखेर 3 गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर विजेतेपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून शुभम सैंदाणे, शुभम पालोद आणि अजित सिंग यांनी काम पाहिले व अत्यंत पारदर्शकपणे निकाल जाहीर केला. विजेते आणि मिळालेली पारितोषिक, प्रथम क्रमांक, प्रवक्ता अकॅडमी, नंदुरबारची विद्यार्थिनी तेजस्विनी गणेश बेहेरे (मार्गदर्शक राकेश महिरे) हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला मान्यवरांच्या हस्ते 'इलेक्ट्रिक स्कुटी' व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
द्वितीय क्रमांक प्रवक्ता अकॅडमी, एरंडोलची विद्यार्थिनी भूमिका जाधव हिने द्वितीय क्रमांक मिळवला. तिला 'इलेक्ट्रिक सायकल' व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
तृतीय क्रमांक, प्रवक्ता अकॅडमी, धरणगावचा विद्यार्थी रुद्राक्ष महाजन याने तृतीय क्रमांक पटकावला. त्याला '32 इंच स्मार्ट टीव्ही' व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बेस्ट स्पीकर अवॉर्ड नंदुरबार येथील मृणाली पाटील हिला तिच्या उत्कृष्ट व प्रभावी वक्तृत्वासाठी 'बेस्ट स्पीकर अवॉर्ड' देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला नवसारी महानगरपालिकेचे महापौर अशोक धोराजीया, स्वामी श्री नारायण मुनिदेव देवधामचे स्वामी श्री हरजीवनदासजी, नवसारी जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रकाश माधवराव पाटील, नवसारी जिल्ह्याचे समादेशक (कमांडंट) व पाटील समाज ट्रस्टचे अध्यक्ष सतीश परशुराम बोरसे, भाजप नवसारीचे मंत्री जगदीश गोविंद पाटील आणि नगरसेवक सुनील रघुनाथ पाटील आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास प्रवक्ता अकॅडमीचे संस्थापक व संचालक रवींद्र पाटील, गुजरात प्रमुख निलेश पाटील, महाराष्ट्र प्रमुख शशिकांत महाजन, मार्केटिंग प्रमुख विजय पाटील, धुळे जिल्हा प्रमुख सागर वाणी, नंदुरबार जिल्हा प्रमुख राकेश महिरे आणि प्रवक्ता अकॅडमीचे संचालक मंडळ विशेषत्वाने उपस्थित होते.
स्पर्धकांना मार्गदर्शन करताना संस्थापक व संचालक रवींद्र पाटील म्हणाले, "आजच्या युगात प्रभावी वक्तृत्व आणि संवाद कौशल्य ही यशाची गुरुकिल्ली आहे. देशभरातील इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या विचारांचे व्यासपीठ गाजवले, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे."
या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी सर्व विजेत्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे आणि आयोजकांचे भरभरून कौतुक केले. उत्कृष्ट नियोजन आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे प्रवक्ता अकॅडमीच्या या राष्ट्रीय स्पर्धेचे सर्वत्र कौतुक होत आहे.



