*जिल्ह्यात 3,4 व 10, 11 ऑक्टोबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन,18 ते 19 वयोगटातील युवक-युवतींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्ह्यात 3,4 व 10, 11 ऑक्टोबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन,18 ते 19 वयोगटातील युवक-युवतींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
*जिल्ह्यात 3,4 व 10, 11 ऑक्टोबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन,18 ते 19 वयोगटातील युवक-युवतींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आगामी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांना, विशेषतः नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी 3 व 4 ऑक्टोबर तसेच 10 व 11 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्ह्यात विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. 18 ते 19 वयोगटातील युवक-युवतींसह पात्र नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 29 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीतील निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणीला गती देण्यासाठी विशेष स्वीप (SVEEP) उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापूर या चारही विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रथम टप्पा शनिवार 3 ऑक्टोबर व रविवार 4 ऑक्टोबर 2026,
द्वितीय टप्पा शनिवार 10 ऑक्टोबर व रविवार 11 ऑक्टोबर 2026,
वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. विशेष शिबिरांच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर ) आवश्यक फार्म क्र.6,7 आणि 8 अर्जांसह उपस्थित राहणार आहेत. 1 जानेवारी 2026 रोजी किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या पात्र युवक- युवतींना नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना अर्ज क्र. 6 भरता येईल. मतदार यादीतील नाव, छायाचित्र किंवा अन्य तपशीलात दुरुस्ती तसेच पत्ता बदलासाठी नमुना अर्ज क्र. 8 भरता येईल. याशिवाय नागरिकांना Voter Helpline App किंवा voters.eci.gov.in या संकेत स्थळाद्वारे मोबाईलवरून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. मतदान केंद्रावर उपस्थित बीएलओ नागरिकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करतील.
जिल्ह्यातील एकही पात्र नागरिक मतदार यादीत नाव नोंदणीपासून वंचित राहू नये, म्हणून विशेषतः शाळा व महाविद्यालयांमधील 18 ते 19 वयोगटातील युवक-युवतींनी तसेच अद्याप मतदार नोंदणी न केलेल्या पात्र नागरिकांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



