*दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांतील इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये-राज्य मंडळाच्या सूचना*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांतील इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये-राज्य मंडळाच्या सूचना*
*दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांतील इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये-राज्य मंडळाच्या सूचना*
मुंबई(प्रतिनिधी):-राज्यातील दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदनपत्रे भरून घेण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत. मदत व पुनर्वसन विभागाच्या 25 सप्टेंबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने विशेष बाब म्हणून विविध सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वीच्या परीक्षांसाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता आवेदनपत्रे भरून घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
याबाबतच्या पुढील सविस्तर सूचना राज्य मंडळाकडून स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असून सर्व विभागीय मंडळांनी आपल्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना तात्काळ सूचना देण्यास सांगितले आहे. तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे तातडीने सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.



