*जिल्हयात"श्रीगणेशा आरोग्याचा"अभियान 2026 यशस्वीरीत्या संपन्न,"श्रीगणेशा आरोग्याचा"अंतर्गत जिल्हयात 25 हजाराहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हयात"श्रीगणेशा आरोग्याचा"अभियान 2026 यशस्वीरीत्या संपन्न,"श्रीगणेशा आरोग्याचा"अंतर्गत जिल्हयात 25 हजाराहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी*
*जिल्हयात"श्रीगणेशा आरोग्याचा"अभियान 2026 यशस्वीरीत्या संपन्न,"श्रीगणेशा आरोग्याचा"अंतर्गत जिल्हयात 25 हजाराहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून राबविलेल्या "श्रीगणेशा आरोग्याचा" अभियानाला जिल्हयात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकुण 512 शिबिरांचे आयोजन केले या शिबिरांमध्ये 25 हजार 295 नागरिकांची आरोग्य तपासणी केली. जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमूख रामेश्वर नाईक यांच्या पुढाकारातून हे अभियान राबविण्यात आले. त्याअंतर्गत तपासणी झालेल्यांमध्ये 10 हजार 141 पुरुष, 10 हजार 980 महिला आणि 4 हजार 174 बालकांचा समावेश आहे. अभियानांतर्गत मेडिसीन / कार्यचिकित्सा विभागात 7 हजार 944 तपासणी झाली. याशिवाय हृदयविकार विभागात 210, अस्थिविकार 702, बालरोग 1 हजार 548, स्त्रीरोग 1 हजार 119, कान -नाक-घसा 299, नेत्रविकार 304, त्वचाविकार 459, इतरव्यधी 674 आणि शल्यतंत्र विभागात 366 नागरिकांची तपासणी करण्यात आली. या अभियाना दरम्यान 4 हजार 539 रक्त तपासण्या, 719 इसीजी तपासणी केल्या. तसेच 1 हजार 195 आयुष्यमान / आभा कार्ड नोंदणी, 151 गोल्डन कार्ड आणि 139 रक्तदात्यांची नोंद झाली. अभियानाच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी तसेच जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
सदर शिबिरांचे आयोजन जिल्हयातील नोंदणीकृत गणेश मंडळ, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष संलग्नित रूग्णालये नंदुरबार, जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार, डी.पी. गावित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय पथराई, धर्मादाय रुग्णालये, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना संलग्न रुग्णालयांच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात आले.



