*विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2026 च्या नियोजनासाठी आढावा बैठक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2026 च्या नियोजनासाठी आढावा बैठक*
*विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2026 च्या नियोजनासाठी आढावा बैठक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-डॉ.रविंद्र हिरालाल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तेली कर्मचारी संघटना व तेली युवक आघाडी नंदुरबार शहर पदाधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक दिनांक 27 सप्टेंबर 2026 रविवार रोजी संपन्न झाली.
बैठकीत रविवार, 4 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित होणाऱ्या विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी गुणवंत, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांचा सत्कार, मान्यवरांचे मार्गदर्शन, कार्यक्रमाचे स्वरूप, आयोजन व विविध जबाबदाऱ्यांचे नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदसय यांनी सहकार्य करावे व समाज बंधु भगिनी व विद्यार्थीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.



