*जामिया आय.टी.आय अक्कलकुवा येथे पदवी प्रदान कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जामिया आय.टी.आय अक्कलकुवा येथे पदवी प्रदान कार्यक्रम संपन्न*
*जामिया आय.टी.आय अक्कलकुवा येथे पदवी प्रदान कार्यक्रम संपन्न*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 2026 (आय.टी. आय) परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवी वितरणाचा व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारोह कार्यक्रम संपन्न झाला,
कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष मौलाना हुजैफा वस्तानवी, संस्थेचे पदाधिकारी मौलाना जाविद, मौलाना हसीब व सर्व विभागाचे प्राचार्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मौलाना हुजैफा वस्तानवी ह्यांच्या हस्ते पारितोषिक व पदवी प्रदान करण्यात आली असून, ह्यामध्ये अंतीम वर्ष व्यवसाय परीक्षेत विभिन्न विभागामधून प्रथम क्रमांक मिळवणारे विध्यार्थी अनुक्रमे डार्फ्ट्समन सिव्हिल मधून कुणाल सरोदे 85.33%, फॅशन डिझाइन मधुन मिस्बाह तेली 89.33% सोलार टेक्निशियन मधून देशमुख मोहम्मद साद 92.5% , प्लंबर मधून मोहम्मद रेहान अन्सारी 90% , कोपा मधून वळवी किरण 92.66% , आर. ए. सी मधून बेलदार आवेस खान 89.83%, फिटर मधून पाडवी नरेंद्र 89.66%, इलेक्ट्रिशियन मधून फरहान आलम 90.16% टक्के घेऊन प्रथम तसेच कॉलेज मधून पहिल्या तीन क्रमांकामध्ये (टॉप थ्री) मोटार मेकॅनिक ट्रेड चे विध्यार्थी अनुक्रमे खान काझीम 95% प्रथम,वळवी अंकित 94% द्वितीय तर तडवी हुजैफा 93.5 % तृतीय क्रमांक पटकावले ह्या सर्वांना संस्थाध्यक्ष मौलाना हुजैफा वस्तानवी ह्यांच्या हस्ते पारितोषिक व पदवी प्रदान करण्यात आली
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि संस्थेच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे विद्यार्थी सांगतात. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे प्राचार्य अकबर पटेल तसेच उप प्राचार्य इलियास पटेल यांनी केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजनासाठी शेख शोएब व काझी शफीक ह्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख रईस यांनी केले व आभार पटेल इलियास यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.



