*पावसाअभावी पिके करपली; शेतकऱ्यांना प्रति एकर एक लाख रुपयांची मदत द्या,बसपाचे 17 सप्टेंबरला "ढोल बजाओ धरणे आंदोलन !"*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पावसाअभावी पिके करपली; शेतकऱ्यांना प्रति एकर एक लाख रुपयांची मदत द्या,बसपाचे 17 सप्टेंबरला "ढोल बजाओ धरणे आंदोलन !"*
*पावसाअभावी पिके करपली; शेतकऱ्यांना प्रति एकर एक लाख रुपयांची मदत द्या,बसपाचे 17 सप्टेंबरला "ढोल बजाओ धरणे आंदोलन !"*
नांदेड(प्रतिनिधी):-मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे पिकांवर गंभीर संकट ओढवले आहे. पावसाअभावी पिके करपून जाऊ लागली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने शासनाने प्रति एकरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी बहुजन समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यामुळे निद्रिस्त शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 17 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाव धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट अधिक गडद होत असून, कर्जबाजारीपणा आणि उत्पादन खर्चाचा वाढता बोजा यामुळे अनेक शेतकरी हतबल झाले आहेत. या परिस्थितीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या गंभीर परिस्थितीची शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना प्रति एकर एक लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी बसपने केली आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना घेण्यात आले आहे. या मागणीसाठी बहुजन समाज पक्षाच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड समोर "ढोल बजाओ प्रचंड धरणे आंदोलन" करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत, पावसाअभावी झालेल्या पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे, दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून आवश्यक त्या सर्व सवलती व उपाययोजना आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या आंदोलनास मनीष कावळे (प्रदेश तथा मराठवाडा झोन प्रभारी), इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर (महाराष्ट्र प्रदेश सचिव) यांचे मार्गदर्शन लाभणार असून बसपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, शेतकरी, शेतमजूर, बहुजन समाजातील नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असलेल्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुभाष भोकरे (जिल्हाध्यक्ष), शिवाजी सोनटक्के, जिल्हा प्रभारी) बहुजन समाज पक्ष यांच्या वतीने करण्यात आले आहे.



