*विकासाच्या घोषणा कागदावर नको प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा-रविंद्र भिलवंडे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विकासाच्या घोषणा कागदावर नको प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा-रविंद्र भिलवंडे*
*विकासाच्या घोषणा कागदावर नको प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा-रविंद्र भिलवंडे*
नायगाव(प्रतिनिधी):-नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी विविध मंत्रिमंडळाच्या बैठका तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आलेल्या घोषणा आणि अद्याप प्रलंबित असलेली विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नायगाव तालुकाप्रमुख रविंद्र भिलवंडे यांनी नायगाव तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध सरकारांच्या काळात छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाच्या बैठका घेण्यात आल्या. तसेच नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नायगाव तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. मात्र, घोषणा होऊन बराच कालावधी उलटूनही अनेक कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत, तर काही कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे शासनाच्या विकासाच्या घोषणांचा प्रत्यक्ष लाभ जनतेला कधी मिळणार, असा सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.
नायगाव तालुक्यातील प्रमुख मागण्या : नरसी-धुंगराळा येथील 220 के.व्ही. केंद्र तातडीने सुरू करावे,शेळगाव छत्री ते कुंटूर या रस्त्यावर कोकलेगाव येथे पुलाचे काम तातडीने सुरू करावे, नायगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्यावे,
तालुक्यातील स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा.
नायगाव तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामांची चौकशी करावी.
या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावावीत अशी मागणी रविंद्र भिलवंडे यांनी केली असून यावेळी नायगाव विधानसभा प्रमुख राजेश लंगडापुरे, उपसंघटक बालाजी माली पाटील,शहर प्रमुख गजानन तमलुरे, तालुका संघटक मारुती भागानगरे, संतोष देशमुख, बालाजी कुरे, रावसाहेब वडजे, पप्पान गायकवाड, रफिक पठाण, अनिकेत शिंदे, देविदास बेलकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.



