*समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग बालकांसाठी अलिमको मोजमाप शिबिर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग बालकांसाठी अलिमको मोजमाप शिबिर*
*समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग बालकांसाठी अलिमको मोजमाप शिबिर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नगरपालिका शाळा क्रमांक 1, नंदुरबार येथे समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग बालकांसाठी अलिमको (ALIMCO) मोजमाप व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिराचा मुख्य उद्देश दिव्यांग बालकांच्या गरजा ओळखून त्यांना आवश्यक असणारी विविध सहाय्यक साधने व उपकरणे उपलब्ध करून देणे हा होता. या शिबिरास उपशिक्षणाधिकारीनिलेश लोहकरे, नंदुरबार गटाचे गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे,विस्तार अधिकारी एस. एन. पाटील, विस्तार अधिकारी मंगेश निकम तसेच जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी संबंधित अधिकारी, सर्व विशेष शिक्षक तसेच दिव्यांग बालक व त्यांचे पालक उपस्थित होते. शिबिरामध्ये उपस्थित दिव्यांग बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत सखोल तपासणी करण्यात आली. प्रत्येक बालकाच्या दिव्यांगत्वाचे स्वरूप, शारीरिक गरजा तसेच त्याला आवश्यक असणाऱ्या सहाय्यक साधनांचे मोजमाप करण्यात आले. गरजेनुसार व्हीलचेअर, ट्रायसायकल, श्रवणयंत्र, काठी, वॉकर, रोलॅटर तसेच इतर आवश्यक सहाय्यक साधने व उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी पात्र बालकांची नोंदणी व संदर्भ प्रक्रिया करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी बालकांची वैयक्तिक तपासणी करून त्यांच्या आवश्यकतेनुसार योग्य साधन- साहित्याची शिफारस केली. यामुळे दिव्यांग बालकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात अधिक स्वावलंबी होण्यास मदत होणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही आवश्यक सहाय्य मिळणार आहे. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित सर्व अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, विशेष शिक्षक व संबंधित कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. समावेशित शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांग बालकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले.



