*जिल्ह्यात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा; विजेत्या मंडळांना रोख पारितोषिके, सहभागासाठी 11 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्ह्यात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा; विजेत्या मंडळांना रोख पारितोषिके, सहभागासाठी 11 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत*
*जिल्ह्यात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा; विजेत्या मंडळांना रोख पारितोषिके, सहभागासाठी 11 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने सन 2026 च्या गणेशोत्सवानिमित्त 'जिल्हास्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026' चे आयोजन करण्यात आले आहे. 14 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत व परवानाधारक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा स्पर्धा समितीचे सदस्य सचिव शशांक काळे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. शासनाच्या 17 ऑगस्ट 2026 रोजीच्या निर्णयानुसार ही स्पर्धा राबवली जात आहे. जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे: प्रथम क्रमांक 50 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक 40 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक 30 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र, स्पर्धेच्या प्रमुख अटी व नियम
पात्रता स्पर्धेत केवळ अधिकृत यंत्रणेकडे नोंदणीकृत संस्था अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेच सहभागी होऊ शकतील.
अर्जाची मुदत पात्र मंडळांनी अकादमीच्या ganeshotsav.pldmka.co.in या अधिकृत पोर्टलवरून आपला अर्ज 11 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन सादर करायचा आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
नवीन मंडळांना संधी इतर मंडळांना सहभागाची संधी मिळावी या उद्देशाने, चालू वर्षाच्या मागील सलग दोन वर्षे राज्य अथवा जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त झालेल्या मंडळांना या स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. ही अट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गणेशोत्सव मंडळांनाही लागू राहील. मूल्यांकन कालावधी मंडळांनी मागील वर्षाच्या अनंत चतुर्दशीपासून चालू वर्षाच्या अनंत चतुर्दशीपर्यंत केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणपूरक कामांचा कालावधी मूल्यमापनासाठी ग्राह्य धरला जाईल. कागदपत्रे तपासणी, निवड समितीने निश्चित केलेल्या दिनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे व माहिती सादर करण्याची जबाबदारी संबंधित मंडळांची असेल.पारितोषिक नियम एकाच मंडळाची तालुका आणि जिल्हा अशा दोन्ही स्तरांवर निवड झाल्यास, त्या मंडळाला नियमानुसार केवळ जिल्हास्तरावरील सर्वोच्च रकमेचेच पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेचे समन्वयक म्हणून संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी हे कामकाज पाहत असून, निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी मुदतीत नोंदणी करून स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असेही आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



