*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा*
*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-5 सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती व महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून के.आर.पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाला उपाध्यक्ष सिद्धार्थ वाणी, संचालिका श्रीमती केतकीबेन वाणी, छाया शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन किशोर वाणी होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी, “शिक्षक हा समाजव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना शिस्तप्रिय व जबाबदार नागरिक घडविण्याचे महान कार्य शिक्षक करतात,” असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांचा सन्मान केला. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कुमारी अनुष्का पाटील हिने प्राचार्यपदाची भूमिका साकारत कार्यक्रमात रंगत आणली. तसेच कुमार रुपार्थ भावसार यांने उपप्राचार्यांची भूमिका साकारून शिक्षकांच्या जबाबदाऱ्या व कार्यपद्धतीचे प्रभावी सादरीकरण केले व सर्व शिक्षकांचे सत्कार व आभार प्रदर्शन करण्यात आले.



