ताजा खबरे:
*गणेशोत्सवाचे खास आकर्षण संदेश काटकर यांचे "कौशल्याचा पुत्र राम" गीत प्रदर्शित*
*कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी संस्थेचा "स्नेहमेळावा आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा" उपस्थितीत जल्लोषात संपन्न*
*कशेळी येथे युवा ग्रुप वाडीवठारतर्फे भव्य रक्तदान शिबिर*
*"संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे", विनोदवीर ह.भ.प.नाना महाराज दोंडाईचेकर, यांच्या रसाळ कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध*
*‘मूर्ती छोटी असली तरी मातीचीच!’ शाळू मातीच्या गणेशमूर्तींना नंदुरबारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*‘मूर्ती छोटी असली तरी मातीचीच!’ शाळू मातीच्या गणेशमूर्तींना नंदुरबारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*‘मूर्ती छोटी असली तरी मातीचीच!’ शाळू मातीच्या गणेशमूर्तींना नंदुरबारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

  • Share:

*‘मूर्ती छोटी असली तरी मातीचीच!’ शाळू मातीच्या गणेशमूर्तींना नंदुरबारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प;1 हजारांहून अधिक मूर्ती उपलब्ध — शहादा, तळोदा, नवापूर, धडगाव, दोंडाईचासह परिसरातून नागरिकांची बुकिंगसाठी गर्दी होत आहे. “गणेशमूर्ती छोटी बसवू, पण ती शाळू मातीचीच बसवू!” या संकल्पनेला यंदा नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शाळू मातीच्या गणेशमूर्तींच्या बुकिंगसाठी शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतून नागरिक नंदुरबार येथे दाखल होत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश कला केंद्र, परदेशीपुरा, श्रीराम मंदिराजवळ, आमदार कार्यालयासमोर, नंदुरबार येथे पेण येथील विविध आकार, आकर्षक व कलात्मक स्वरूपातील १ हजारांहून अधिक शाडू मातीच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवाला अद्याप काही दिवसांचा अवधी असतानाच मूर्तींच्या बुकिंगला मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. श्री गणेश कला केंद्र, आमदार कार्यालय जवळ, नंदुरबार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मूर्ती बुकिंग होत आहेत. ‘मोठी मूर्ती’पेक्षा ‘पर्यावरणाची जबाबदारी’ महत्त्वाची
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या आकाराच्या मूर्तींचे आकर्षण असले, तरी यंदा अनेक नागरिकांनी पर्यावरणाचा विचार करून लहान आकाराची, मात्र शाळू मातीची गणेशमूर्ती बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मूर्तीचा आकार नव्हे, तर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे महत्त्वाचे, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.
तालुक्यांच्या सीमा ओलांडून नंदुरबारमध्ये बुकिंग, शाळू मातीच्या गणेशमूर्तींना मिळणाऱ्या प्रतिसादाची व्याप्ती केवळ नंदुरबार शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही. शहादा, तळोदा, नवापूर, धडगाव, दोंडाईचा तसेच परिसरातील विविध गावांमधून नागरिक मूर्तींच्या बुकिंगसाठी नंदुरबार येथे येत आहेत. त्यामुळे शाळू मातीच्या मूर्तींबाबतची जनजागृती आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना ग्रामीण भागातही रुजत असल्याचे दिसून येत आहे.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे विसर्जनानंतर जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. त्या पार्श्वभूमीवर शाळू मातीच्या मूर्ती हा पर्यावरणपूरक पर्याय मानला जातो. त्यामुळे “बाप्पा घरी आणायचा, पण निसर्गाला त्रास न देता” अशी भावना नागरिकांमध्ये दृढ होत असून, यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिक व्यापक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नंदुरबारमध्ये शाळू मातीच्या गणेशमूर्तींच्या बुकिंगला मिळत असलेला हा प्रतिसाद पाहता, यंदाचा गणेशोत्सव भक्तीसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरणार, अशी सकारात्मक चिन्हे दिसून येत आहेत.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*गणेशोत्सवाचे खास आकर्षण संदेश काटकर यांचे "कौशल्याचा पुत्र राम" गीत प्रदर्शित*
September, 03 2026
*कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी संस्थेचा "स्नेहमेळावा आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा" उपस्थितीत जल्लोषात संपन्न*
September, 03 2026
*कशेळी येथे युवा ग्रुप वाडीवठारतर्फे भव्य रक्तदान शिबिर*
September, 03 2026
*"संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे", विनोदवीर ह.भ.प.नाना महाराज दोंडाईचेकर, यांच्या रसाळ कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध*
September, 03 2026
*‘मूर्ती छोटी असली तरी मातीचीच!’ शाळू मातीच्या गणेशमूर्तींना नंदुरबारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
September, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज