ताजा खबरे:
*देवरे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
*आदिवासी पारंपारिक वाद्य वाजविणाऱ्या आदिवासी कलाकारांचे,अक्कलकुवा तालुका आदिवासी रूढी परंपरा जतन समितीच्या वतीने,सन्मानपत्र देऊन गौरव*
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे रक्तदान शिबीर*
*पोषण अभियानांतर्गत मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनीचे उत्साहात उद्घाटन*
*क्लस्टरस्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात, ढोंगसागाळीच्या एकलव्य विद्यालयाची तिहेरी कामगिरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ*

  • Share:

*अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ*
शहादा(प्रतिनिधी):-श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सोहळ्याचा शुभारंभ श्री गोकर्णेश्वर महादेव मंदिर प्रांगण, साईबाबा नगर, शहादा येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी प्रख्यात कीर्तनकार ह.भ. प. राज महाराज पडावदकर (पदवद, ता. शिंदखेडा, जि. धुळे) यांनी आपल्या ओजस्वी वाणीने आणि संतविचारांच्या प्रभावी निरूपणातून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. "कर्म हीच पूजा" या संत सेना महाराजांच्या जीवन तत्त्वज्ञानावर आधारित कीर्तनातून त्यांनी समाजात सदाचार, कर्तव्यनिष्ठा, व्यसनमुक्ती, संतसंग आणि हरिनामाचे महत्त्व अधोरेखित केले.
कीर्तनादरम्यान विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. उपस्थित भाविकांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनाम संकीर्तनाचा आनंद घेतला. "जय जय विठोबा रखुमाई", "जय जय राम कृष्ण हरी" आणि "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" या जयघोषांनी वातावरण दुमदुमून गेले. या सप्ताहाच्या पहिल्या पुष्पाचे मुख्य यजमान अखिल भारतीय समाजाचे अध्यक्ष उद्धव मक्कन जांभळे होते. त्यांच्या वतीने प्राचार्य डॉ. उद्धव जाधव यांच्याहस्ते ह.भ.प. राज महाराज पडावदकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील अनेक मान्यवर, वारकरी, महिला भगिनी, युवक तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी हेमराज प्रकाश पवार व सौ. ममता हेमराज पवार यांच्यासह सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, जे भाविक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी आयोजकांनी YouTube आणि Facebook Live द्वारे थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे भाविकांना घरबसल्या कीर्तनाचा लाभ घेता येत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अनिल साळुंके यांनी केले.
सप्ताहातील पुढील दिवसांमध्ये विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली असून, या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन  आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*देवरे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
September, 02 2026
*आदिवासी पारंपारिक वाद्य वाजविणाऱ्या आदिवासी कलाकारांचे,अक्कलकुवा तालुका आदिवासी रूढी परंपरा जतन समितीच्या वतीने,सन्मानपत्र देऊन गौरव*
September, 02 2026
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे रक्तदान शिबीर*
September, 02 2026
*पोषण अभियानांतर्गत मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनीचे उत्साहात उद्घाटन*
September, 02 2026
*क्लस्टरस्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात, ढोंगसागाळीच्या एकलव्य विद्यालयाची तिहेरी कामगिरी*
September, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज