*द्वारकाधीश मंदिरात उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*द्वारकाधीश मंदिरात उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव*
*द्वारकाधीश मंदिरात उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दोनशे वर्षांपूर्वी परमपूज्य विठ्ठल स्वामी महाराज यांनी स्थापित केलेल्या हाट दरवाजा श्री द्वारकाधीश मंदिरात उद्या शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव होईल. परम परमात्मा परब्रम्ह सच्चिदानंद श्री द्वारकाधीश परमात्मा यांच्या जन्मोत्सव म्हणजेच जन्माष्टमी श्रीकृष्ण जयंती 4 सप्टेंबर शुक्रवार रोजी मंदिरात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी 6 वा. काकड आरती, मंगळा आरती, अभिषेक व पूजा,धुपारती होईल. दुपारी 4 ते 6 भजनाचा कार्यक्रम होईल.
रात्री 11 ते 12 श्रीकृष्ण जन्माख्यानावर प्रशांत जानी महाराज यांचे प्रवचन होईल होईल. रात्री बारा वाजता देवाची आरती व पाळणा दर्शन होईल. सर्व कार्यक्रमास भाविक भक्तांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन श्री द्वारकाधीश मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे.



