*देवळाली प्रवरातून श्री भद्रा मारुती पायी दिंडीचे उत्साहात प्रस्थान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवळाली प्रवरातून श्री भद्रा मारुती पायी दिंडीचे उत्साहात प्रस्थान*
*देवळाली प्रवरातून श्री भद्रा मारुती पायी दिंडीचे उत्साहात प्रस्थान*
देवळालीप्रवरा(प्रतिनिधी):-श्रीक्षेत्र देवळाली प्रवरा येथून श्रीक्षेत्र खुलताबादकडे जाणाऱ्या श्री भद्रा मारुती पायी दिंडी सोहळ्याचे आज रसोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात दिंडी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. गेल्या 21 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या पायी दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत. भगवा ध्वज फडकविल्यानंतर भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गस्थ झाली.
यावेळी दिंडी सोहळ्यासाठी सहभागी झालेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी विशेष नियोजन केले असून, मार्गातील विविध ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी शहाजी कदम, कृष्णा मुसमाडे, आप्पासाहेब ढुस, रावसाहेब मुसमाडे, भगवान गडाख,नानासाहेब कदम, डी.के. कदम, जालिंदर मुसमाडे, राजेंद्र चव्हाण, कांता कदम, देवराम कडू, संजय बर्डे, शिवराम कडू, आबा कदम, जालिंदर भांड, बाळासाहेब गाडे , निवृत्ती पठारे, शिवाजी घाडगे, कुंडली खरात, सुखदेव हुडे, रामभाऊ अटक, बाळासाहेब कदम, मारुती पठारे, अण्णासाहेब चव्हाण आदिंसह भाविक उपस्थित होते.



