*रक्षाबंधनानिमित्त कार्यशाळा व राखी बांधण्याचा कार्यक्रम उत्साहात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रक्षाबंधनानिमित्त कार्यशाळा व राखी बांधण्याचा कार्यक्रम उत्साहात*
*रक्षाबंधनानिमित्त कार्यशाळा व राखी बांधण्याचा कार्यक्रम उत्साहात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हिरा प्रतिष्ठान संचलित काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर व संस्कृती शिशू विहार यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथे रक्षाबंधनानिमित्त राखी तयार करण्याची कार्यशाळा व राखी बांधण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यामंदिराचे मुख्याध्यापक युवराज भामरे होते. इयत्ता बालवाडी ते चौथीच्या वर्गशिक्षकांनी तसेच शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आकर्षक राख्या तयार केल्या. त्यानंतर शिक्षक-शिक्षिका तसेच विद्यार्थी- विद्यार्थिनींनी एकमेकांना राखी बांधून रक्षाबंधन दिन साजरा केला.
रक्षाबंधनाच्या माध्यमातून प्रेम, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.



