*गौरी-गणपती सणासाठी पुणे–कल्याण मार्गे रत्नागिरी विशेष गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गौरी-गणपती सणासाठी पुणे–कल्याण मार्गे रत्नागिरी विशेष गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी*
*गौरी-गणपती सणासाठी पुणे–कल्याण मार्गे रत्नागिरी विशेष गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी*
कल्याण(प्रतिनिधी):-गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन गाडी क्र. 01447/01448 पुणे–रत्नागिरी–पुणे ही विशेष गाडी कायमस्वरूपी नियमित करण्यात यावी तसेच सध्याच्या गाडीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था, कल्याण – सावंतवाडी (रजि)यांच्या वतीने करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक - अध्यक्ष सुनील सिताराम उतेकर यांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना निवेदन देऊन ही मागणी केली.
दिवा, कसारा, कर्जत, नवी मुंबई, पुणे, भिवंडी, कल्याण तसेच परिसरातील मोठ्या संख्येने कोकण प्रवासी वास्तव्यास आहेत. या प्रवाशांना गौरी-गणपती तसेच वर्षभर कोकणात जाण्यासाठी थेट आणि सोयीची रेल्वे सेवा उपलब्ध झाल्यास त्यांचा प्रवास अधिक सुखकर होईल.
पुणे–कल्याण मार्गे रत्नागिरीपर्यंत ही गाडी कायमस्वरूपी सुरू केल्यास कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तसेच रेल्वेला अधिक प्रवासी मिळाल्याने रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांची गरज लक्षात घेऊन गाडी क्र. 01447/01448 ला मुदतवाढ देऊन ती कायमस्वरूपी नियमित करण्यात यावी, अशी संस्थेची ठाम मागणी आहे. या मागणीसाठी संस्थेचे अध्यक्ष सुनील सिताराम उतेकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे प्रमुख सदस्य यशवंत परब, सौ. सुरेखा दिविळकर, श्रीमती दिपाली आमडोसकर, सौ. सुनीता खेताडे, सौ. नंदा महाने, अनिल गायकवाड, भीमया कुमारी, अनिल सरदार, निशांत कांबळे आदी प्रयत्नशील आहेत.



