*जिल्हाधिकारी कार्यालयात 17 ऑगस्टला 'महिला लोकशाही दिन',पीडित व समस्याग्रस्त महिलांसाठी प्रत्यक्ष व ऑनलाईन प्रणालीद्वारे तक्रारी मांडण्याची सोय*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हाधिकारी कार्यालयात 17 ऑगस्टला 'महिला लोकशाही दिन',पीडित व समस्याग्रस्त महिलांसाठी प्रत्यक्ष व ऑनलाईन प्रणालीद्वारे तक्रारी मांडण्याची सोय*
*जिल्हाधिकारी कार्यालयात 17 ऑगस्टला 'महिला लोकशाही दिन',पीडित व समस्याग्रस्त महिलांसाठी प्रत्यक्ष व ऑनलाईन प्रणालीद्वारे तक्रारी मांडण्याची सोय*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना शासकीय यंत्रणेकडून सुलभ मार्गदर्शनासह त्वरित न्याय मिळावा, यासाठी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 01 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात जिल्हास्तरीय 'महिला लोकशाही दिना'चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी एका शासकीस प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
महिलांच्या तक्रारी व अडचणींचे शासकीय यंत्रणेकडून वेळेत निवारण व्हावे, यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन राबवण्यात येतो. या महिला लोकशाही दिनात सहभागी होण्यासाठी तक्रारदार महिलांनी आपले तक्रार अर्ज घेऊन 17 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 01 वाजेपर्यंत रंगावली सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे स्वतः उपस्थित राहावे. तसेच, ज्या महिलांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांच्यासाठी दुपारी 01 ते 02 या वेळेत ऑनलाईन माध्यमातून तक्रार मांडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिला https://meet.google.com/rba-ywjn-fnz या लिंकवर जॉईन होऊन आपली तक्रार मांडू शकतात. तक्रारींबाबत महत्त्वाचे नियम व अटी: तक्रार ही केवळ वैयक्तिक स्वरूपाची असावी. न्यायप्रविष्ट (न्यायालयात प्रलंबित), आस्थापनाविषयक तसेच सामूहिक स्वरूपाच्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत.
नंदुरबार जिल्ह्यातील गरजू व पीडित महिलांनी आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी या महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पाटील यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



