*टिटवाळ्यात पाणी प्रश्नावर हालचाल - नेपाली पाडा ते नांदप रोडपर्यंत नवीन जलवाहिनीला नगरसेवकांचे सकारात्मक आश्वासन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*टिटवाळ्यात पाणी प्रश्नावर हालचाल - नेपाली पाडा ते नांदप रोडपर्यंत नवीन जलवाहिनीला नगरसेवकांचे सकारात्मक आश्वासन*
*टिटवाळ्यात पाणी प्रश्नावर हालचाल - नेपाली पाडा ते नांदप रोडपर्यंत नवीन जलवाहिनीला नगरसेवकांचे सकारात्मक आश्वासन*
टिटवाळा(प्रतिनिधी):-पूर्वेकडील इंदिरानगर, नेपाली पाडा ते नांदप रोड या परिसरात गेली अनेक वर्षे भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येच्या निराकरणासाठी कोकण रहिवाशी मंडळ टिटवाळा (रजि) च्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवक बंदेश जाधव यांची भेट घेऊन अधिकृत निवेदन सादर केले. यावेळी परिसरातील नवीन जलवाहिनी प्रकल्प तातडीने राबवण्याची मागणी करण्यात आली. मंडळाने दिलेल्या निवेदनात नेपाली पाडा ते नांदप रोड या संपूर्ण पट्ट्यात दोन्ही बाजूंनी राजे शिवछत्रपती चौकापर्यंत नवीन पाण्याच्या पाईपलाईनचे काम करण्यात यावे, अशी ठोस मागणी करण्यात आली. या भागातील नागरिकांना अनेक वर्षापासून मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. रहिवाशांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर नगरसेवक बंदश जाधव यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी सदर कामाची तातडीने माहिती घेऊन रहिवाशांना पाणीटंचाईच्या समस्येतून मार्ग काढण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.
यापूर्वी नगरसेवक मयुर पाटील यांच्याशीही या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती.
परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, प्रस्तावित नवीन जलवाहिनीचे काम त्वरित सुरू करण्यात यावे अशी नम्र विनंती मंडळाच्या वतीने करण्यात आली. रहिवाशांच्या वतीने नगरसेवक बंदेश जाधव यांच्या सहकार्याबद्दल आणि परिसराच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मनःपूर्वक आभार_
व्यक्त करण्यात आले.
मंडळाचे सल्लागार सतोष राणे यांच्या मार्गदर्शन
समाजसेवक यशवंत परब, मंडळाचे सचिव निलेश राणे, नामदेव पिचुर्ले, सौ. प्रेमलता तावडे, दिलीप चिपकर,राजेंद्र गावडे, गोपीचंद घाटये, संतोष भोसले, नितीन कदम, विनायक दळवी, भिव धुरे यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.



