*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश;अंतिम वर्ष बी.फार्मसी परीक्षेत विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश;अंतिम वर्ष बी.फार्मसी परीक्षेत विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश;अंतिम वर्ष बी.फार्मसी परीक्षेत विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथील अंतिम वर्ष बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी समर परीक्षा 2025-26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. या परीक्षेत उझमा अब्दुलसलाम मुल्ला हिने 8.55 SGPA (442 गुण) मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कल्पेश रविंद्र नेरकर याने 8.55 SGPA (432 गुण) मिळवत द्वितीय क्रमांक, तर विकास रवसिंग वळवी याने 8.55 SGPA (428 गुण) मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच हेमांगी किशोर सोनवणे हिने 8.36 SGPA (427 गुण) मिळवत चौथा, तर निशा दादू बागुल हिने 8.36 SGPA (423 गुण) मिळवत पाचवा क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशामागे प्राध्यापकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यास महत्त्वाचा ठरला.