*जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी सर्वेक्षण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी सर्वेक्षण*
*जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी सर्वेक्षण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात आगामी 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत 17 ऑगस्ट 2026 पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेट देऊन गणना फॉर्म (EF) जमा करणार आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापूर या चारही विधानसभा मतदारसंघांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. यानुसार गैरहजर, स्थलांतरित, मयत व दुबार मतदारांची असंकलित (ASDD) यादी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (nandurbar.gov.in) व संबंधित मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींकडे (BLA) उपलब्ध करून देण्यात आली आहे. 16 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन,
जिल्ह्यातील सर्व मतदार व राजकीय पक्षांनी प्रसिद्ध करण्यात आलेल्या गैरहजर, स्थलांतरित, मयत व दुबार मतदारांची यादीची पाहणी करावी. या यादीत नाव असल्यास किंवा दुरुस्ती करावयाची असल्यास नागरिकांनी 16 ऑगस्ट 2026 पावेतो गणना प्रपत्र (Enumeration Form) स्थानिक बीएलओ (BLO) किंवा तहसील कार्यालयात जमा करावे, जेणेकरून प्रारुप मतदार यादीत नावाचा समावेश करता येईल. विधानसभा मतदारसंघनिहाय नवीन प्रस्तावित बदलांचा तपशील:
मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणांतर्गत जिल्ह्यात 5 नवीन मतदान केंद्रे आणि 2 केंद्रांचे विलीनीकरण (Merge) प्रस्तावित आहे.
01-अक्कलकुवा विधानसभा (365 केंद्र): काठी येथील केंद्र क्र. 62 मधून 533 मतदार व 63 मधून 445 मतदार एकत्रित करून 978 मतदारांचे नवीन मतदान केंद्र क्र. 64 काठी प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय गेंदा भाग क्र. 210 आणि खडकी भाग क्र. 213 येथे नवीन मतदान केंद्रे प्रस्तावित आहेत.
02-शहादा विधानसभा (366 केंद्र): या मतदारसंघात कोणतेही नवीन केंद्र प्रस्तावित नाही. 03- नंदुरबार विधानसभा (367 केंद्र): विलीनीकरण: शिरूर दिगर भाग 43 मधील 306 मतदार भाग 42 मध्ये समाविष्ट करून 1 हजार 199 मतदारांचे एकच केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. विलीनीकरण: नांदखें भाग 238 मधील 342 मतदार भाग 237 मध्ये समाविष्ट करून 1 हजार 65 मतदारांचे केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. नवीन केंद्र: टेंभे तर्फे शहादा भाग क्र. 47 येथे नवीन मतदान केंद्र प्रस्तावित आहे.
04-नवापूर विधानसभा (336 केंद्र): राजापूर भाग क्र. 99 येथे नवीन मतदान केंद्र प्रस्तावित आहे.
तक्रार निवारण व संपर्क माध्यम: टोल फ्री क्रमांक: 1950 वर संपर्क साधून मार्गदर्शन मिळवता येईल.
ECINET ॲप: 'Book a Call Request' पर्याय वापरून थेट BLO शी संपर्क साधता येईल. ऑनलाईन अर्ज: 16 ऑगस्ट 2026 पर्यंत NGSP (National Grievance Service Portal) द्वारे ऑनलाईन अर्ज सादर केल्यास मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत त्वरित निर्णय घेतला जाईल.



