*दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी*
*दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कान्हादेशात मोठ्या उत्साहात श्री कानुबाई मातेचा उत्सव श्रावण महिन्यात साजरा केला जातो. यावर्षी नंदुरबार शहरात 16 ऑगस्ट 2026 रविवार रोजी श्री कानुबाई मातेची स्थापना होणार असून 17 ऑगस्ट 2026 सोमवार रोजी विसर्जन होणार आहे. नंदुरबार शहरातील बहुतांश भाविक भक्त श्री कानुबाई मातेचे विसर्जन श्री गजानन महाराज मंदिर शेजारील पुलाजवळील नदीपात्रात करत असतात. यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे नदीपात्रात पाणी नसल्यामुळे भाविक भक्तांना कानुबाई मातेचे विसर्जन करण्यासाठी पाण्याची व्यवस्था तसेच नदीपात्राची स्वच्छता करावी या आशयाचे निवेदनातून पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याकडे हिंदु सेवा सहाय्य समितीने केली. यावर मुख्याधिकारी यांनी तात्काळ संबंधीत विभागाचे अधिकारी यांना कार्यवाहीची सूचना दिल्या.
निवेदनात मागण्या करण्यात आल्या की, श्री कानुबाई माता विसर्जनासाठी गजानन महाराज मंदिर नदीपात्रा जवळ पाण्याचे टँकरने पाण्याची व्यवस्था करावी, गजानन महाराज मंदिर शेजारील नदीपात्रात जाण्यासाठी मार्गावर मोठ्या प्रमाणात गवत, केरकचरा आहे, ते JCB चा सहाय्याने 14 ऑगस्टपर्यंत स्वच्छता करून त्याठिकाणी श्री कानुबाई मातेचा विसर्जन करण्यास जागा स्वछ करून द्यावी, कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी 'निर्माल्य' गोळा करण्यासाठी स्वच्छ गाडीची व्यवस्था करावी व ते निर्माल्य विधिवत विसर्जन करावे, मांस विक्री करणारे त्यांच्याकडील मांसाची घाण नदीपात्रात टाकत असतात त्यामुळे पाणी प्रदूषित होते आणि हिंदूंचा पवित्र सण उत्सवाचा वेळी त्याठिकाणी देवांचे विसर्जन होत असते मांसाची घाण टाकल्यामुळे पावित्र्यही भंग होते, तरी अश्या घाण टाकणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, नदीपात्रात घाण, कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाईचा फलक त्याठिकाणी लावावा असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, पंकज डाबी, उज्वल राजपूत, पंकज मुसळे, संदीप राजपूत, विनायक राजपूत आदी उपस्थित होते.



