*देवरे विद्यालयाचे इ. 7 वी वर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयाचे इ. 7 वी वर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश*
*देवरे विद्यालयाचे इ.7 वी वर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 7 वी साठी घेण्यात येणाऱ्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत
धंगाई विधायक कार्य मंडळ, संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयाचे 30 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यांपैकी 29 विद्यार्थी पात्र झाले असून त्यातून 10 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावत शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. त्यात यशराज संजय पाटील 250 गुण ग्रामीण सर्वसाधारण (J -9/103),मानसी संदीप पाटील 248 गुण ग्रामीण सर्वसाधारण (J -24/103), सौरभ ज्ञानेश्वर पाटील 246 गुण ग्रामीण सर्वसाधारण (J -30/103), हर्षदा जितेंद्र पाटील 246 गुण ग्रामीण सर्वसाधारण (J -32/103), विराज विनोद ठाकरे 246
गुण ग्रामीण सर्वसाधारण (J -35/103), लक्षद्विप महेश पाटील 244 गुण ग्रामीण सर्वसाधारण (J -53/103), प्रणिता योगेश मराठे 244 गुण ग्रामीण सर्वसाधारण (J -54/103), ललिता पावबा पाटील 244 गुण ग्रामीण सर्वसाधारण (J - 65/103), अक्षरा सोपान पाटील 242 गुण ग्रामीण सर्वसाधारण (J - 89/103), वैभवी अभिमन भिल 242
गुण ग्रामीण सर्वसाधारण (J - 95/103), गुणांसह शिष्यवृत्ती पात्र ठरले. गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याबद्दल सदर विद्यार्थ्यांना सलग तीन वर्ष 7500 ₹ प्रती वर्ष शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, शालेय समिती अध्यक्षा शैलजा देवरे, सचिव नरेंद्र देवरे, कोषाध्यक्ष सतीश देवरे, विखरण, नाशिंदा, बोराळा, खापरखेडा आदी गावांतील ग्रामस्थ व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शिक्षकांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डी.डी. साळुंके, एम.डी. नेरकर, सी.व्ही.नांद्रे, डॉ. आर.आर.बागुल, एम.एस.मराठे,डी.बी. भारती, वाय. डी. बागूल,एस. एच. गायकवाड, ए.एस. बेडसे, व्ही. बी.अहिरे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.



