**बामखेडा महाविद्यालयात नशा मुक्त युवा शपथ कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
**बामखेडा महाविद्यालयात नशा मुक्त युवा शपथ कार्यक्रम संपन्न*
*बामखेडा महाविद्यालयात नशा मुक्त युवा शपथ कार्यक्रम संपन्न*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्था संचलित कला व विज्ञान महाविद्यालय बामखेडा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकार युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय यांच्यातर्फे विकसित भारत 2047 या कार्यक्रमांतर्गत आमली पदार्थ मुक्त भारत साकारण्याचा संकल्पनेतून संपूर्ण देशात विकसित भारतासाठी नशा मुक्त युवा कार्यक्रम महाविद्यालयात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. वाघ यांनी केले. त्यांनी या कार्यक्रमाचा हेतू आणि उद्देश स्पष्ट केला.तसेच महाविद्यालयात स्तरावर कशासाठी घेतला जातो याविषयी कारण मीमांसा केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एच.एम.पाटील यांनी ही नशा मुक्त जीवन कसे जगावे त्यातून व्यक्तिमत्व विकास कसा होतो. नशेमुळे आयुष्य कसे उध्वस्त होतं याची अनेक उदाहरणे देऊन आपले विचार मांडले या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नशा मुक्ततेची शपथ प्रा.एम.एस.निकुंभे यांनी दिली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रगटन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. डी.बी. वाघ यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



