*स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्थेची जिल्हास्तरीय कलागुण स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्थेची जिल्हास्तरीय कलागुण स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न*
*स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्थेची जिल्हास्तरीय कलागुण स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न*
चिपळूण(प्रतिनिधी):-माय भारत रत्नागिरी युवा व खेल मंत्रालय भारत सरकार आयोजित स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्था चिपळूण यांच्या संयुक्त विद्यामानाने सती येथे नशामुक्ती दिनाचा औचित्य साधून जिल्हास्तरीय कलागुण स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम पार पाडला. 31 जुलै व 1 ऑगस्ट असे दोन दिवस स्पर्धा घेण्यात आली. पहिला दिवशी न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज खेर्डी सती चिंचघरी व युनायटेड इंग्लिश स्कूल तसेच आनंदराव पवार ज्युनियर व सिनियर कॉलेज येथे घोषवाक्य, स्लॅम पोएटरी, रिल्स ,वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या तसेच या सर्व स्पर्धेमध्ये सुमारे 320 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. अस्मिता केंद्रे व उपनगराध्यक्ष सौ. रुपाली दांडेकर, जिल्हा परिषद सदस्य, सौ.रावी मोरे, क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक सभापती चिपळूण नगर पालिका सौ. हर्षाली पवार, तसेच वरेकर न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेर्डी सती चिंचघरीचे मुख्याध्यापक संजय बनसोडे मुख्याध्यापक युनायटेड स्कूल, रुपेश भालेकर आनंदराव पवार कॉलेज प्राध्यापक सौ.निकिता सावंत, सौ.स्कंदा चितळे, योगेश मोहिते, यदुवीर चौगुले, अमित आदवडे, प्रताप पवार, सौ अर्पिता परब, सौ. एकता सावंत, कु. श्रावणी भुवड, कु. साक्षी शिंदे, कु. स्नेहा साळवी, सौ. स्वरा पं सावंत अध्यक्ष स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्था चिपळूण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
त्या नंतर निकाल जाहीर केला. वक्तृत्व स्पर्धा कु. रिद्धी संतोष चाळके, चित्रकला स्पर्धा स्वरा रेडीज, स्लॅम पोएट्री स्पर्धा कु.वैष्णवी गजानन हळदे, रिल्स कु. प्रथमेश संतोष कांबळी (ग्रुप), नुत्य कु. आर्य लक्ष्मण बोले (आनंद राव पवार कॉलेज ग्रुप), नाटक कु. शुभम रवींद्र पांढरे (सती ज्युनियर कॉलेज ग्रुप), गायण कु. श्रेया पंकज डाकवे (स्वर सिद्ध कला संगीत विद्यालय ग्रुप )प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी राज्यस्तरीय सर्धेस पात्र झाले.



