*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये ‘सुरक्षा कायदा व विद्यार्थी सुरक्षा’ जनजागृती कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये ‘सुरक्षा कायदा व विद्यार्थी सुरक्षा’ जनजागृती कार्यक्रम संपन्न*
*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये ‘सुरक्षा कायदा व विद्यार्थी सुरक्षा’ जनजागृती कार्यक्रम संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूल, नंदुरबार येथे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सुरक्षितते विषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘सुरक्षा कायदा व विद्यार्थी सुरक्षा’ या विषयावरील विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात नंदुरबार पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक महेंद्र चौहान यांनी विद्यार्थ्यांना विविध कायदे, सामाजिक जबाबदाऱ्या तसेच आपत्कालीन परिस्थितीत योग्य वर्तन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अल्पवयीन मुलांनी कायद्याचे पालन करून जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले.
यावेळी विपुल चौधरी यांनी पोलीस हेल्पलाईन क्रमांक – (112), सायबर गुन्हे प्रतिबंध आणि तक्रार नोंदविण्याच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. पोलीस कॉन्स्टेबल सौ.रिबीका नाईक यांनी मुलींची सुरक्षा, महिला संरक्षणविषयक कायदे आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुरक्षा यंत्रणांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणी हे होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ वाणी, प्राचार्या डॉ. छाया शर्मा, पोलीस कॉन्स्टेबल रीतेश इंदवे,आकाश वळवी, हर्षल थोरात तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नदिम शेख यांनी केले.



