*एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘एक पेड माँ के नाम’अभियानांतर्गत वृक्षारोपण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘एक पेड माँ के नाम’अभियानांतर्गत वृक्षारोपण*
*एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘एक पेड माँ के नाम’अभियानांतर्गत वृक्षारोपण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे ‘एक पेड माँ के नाम’ या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी उपप्राचार्य विजय पवार, पर्यवेक्षिक मिनलकुमार वळवी तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षांची लागवड केली. या निमित्ताने प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांनी वृक्षारोपण करतांना सुदंर संदेश दिला उपस्थितांनी “वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा” असा संदेश दिला व केवळ वृक्षारोपण न करता लागवड केलेल्या रोपांची नियमित देखभाल व संवर्धन करण्याचा संकल्पही करण्यात आला. ‘एक पेड माँ के नाम’ ही संकल्पना मातृप्रेमासोबतच निसर्गाप्रती असलेली आपली जबाबदारी अधोरेखित करणारी आहे. प्रत्येकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, असा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला. या उपक्रमामुळे शाळेच्या परिसरात हिरवाई वाढण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.



