*राजापूर पं सं सभापती सौ. नंदिनी कदम यांची ग्रामपंचायत कळसवलीला सदिच्छा भेट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर पं सं सभापती सौ. नंदिनी कदम यांची ग्रामपंचायत कळसवलीला सदिच्छा भेट*
*राजापूर पं सं सभापती सौ. नंदिनी कदम यांची ग्रामपंचायत कळसवलीला सदिच्छा भेट*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील ग्रामपंचायत कळसवली येथे सभापती सौ नंदिनी कदम तसेच पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ मयेकर व प्रसाद मोहरकर यांनी सदिच्छा भेट देऊन ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचा आढावा घेतला.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सौ. सोनाली आराख यांनी ग्रामपंचायतीत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची, शासनाच्या लोकहितकारी योजनांची तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या उल्लेखनीय कामांची सविस्तर माहिती सादर केली. ग्रामपंचायतीने केलेल्या उत्कृष्ट नियोजन, पारदर्शक कामकाज आणि विकासाभिमुख उपक्रमांचे मान्यवरांनी विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायतीच्या आगामी विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली. ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाहीही मान्यवरांनी दिली. यावेळी सभापती सौ. नंदिनी कदम, पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ मयेकर व प्रसाद मोहरकर यांचे ग्रामपंचायत कळसवली परिवारातर्फे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.



