ताजा खबरे:
*बल्लाळ गणेश देवस्थान प्रभानवल्ली येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
*आदर्श जि.प.शाळा तारळ,धुमाळवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप*
*एसआयआर मोहिमेंतर्गत वैजाली येथे विशेष शिबिर; मतदार पडताळणी व डिजिटायझेशनला वेग*
*नटावदकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी गुरूंना केले अभिवादन*
*शेतकरी कर्जमुक्ती योजना थकबाकीच्या रकमेत फरक असल्यास पोर्टलवरील रक्कमच ग्राह्य धरणार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*रेशीम शेती शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी लाभदायक-आमदार आमशा पाडवी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*रेशीम शेती शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी लाभदायक-आमदार आमशा पाडवी*

  • Share:

*रेशीम शेती शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी लाभदायक-आमदार आमशा पाडवी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-डॉ. हेडगेवार सेवा समिती कृषि विज्ञान केंद्र नंदुरबार व कृषि विभाग, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रेशीम शेती कार्यशाळेत अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांनीरेशीम शेती कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना आमदार पाडवी यांनी रेशीम शेती ही आदिवासी समाजाच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन केले. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच रेशीम शेतीसारखे पूरक व्यवसाय स्वीकारून उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शेतक्त्यांनी बांधावर बांबू लागवड व इतर उपयुक्त वृक्षांची लागवड करावी पडीत क्षेत्र विकासासाठी वृक्षारोपणावर भर द्यावा आणि शेतीमध्ये नवनवीन संशोधित तंत्रज्ञान व प्रयोगांचा अवलंब करावा असे त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धन आणि उत्पन्नवाढ या दोन्ही दृष्टीने वृक्ष लागवड महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला सक्षमीकरण ही जिल्ह्याची महत्त्वाची गरज असून महिलांनी शेतीपूरक उद्योग्रबचत गट आणि रेशीम शेतीसारख्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष केदारनाथ कवडीवाले हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार आमशा पाडवी, धनराज कातोरे विश्वस्त डॉ. हेडगेवार सेवा समिती उपस्थित होते. तसेच जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार
शंकर किरवे, सहयोगी अधिष्ठाता कृषि महाविद्यालय नंदुरबार डॉ. यू. बी. होले,  तसेच प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार दीपक पाटील, तालुका कृषि अधिकारी, अक्कलकुवा नामदास, तालुका कृषि अर्धाकारी, तळोदा सौ. मीनाक्षी वळवी  यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविकामध्ये विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण), कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार पद्माकर कुंदे यांनी कार्यक्षेत्रातील रेशीम शेतीचे अनुभव व यशस्वी प्रयोग यांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी रेशीम शेती हा शेतकऱ्यांसाठी पूरक व उत्‌नवाढीसाठी उपयुक्त व्यवसाय असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावा असे आवाहन केले. डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष केदारनाथ
कवडीवाले यांनी आपल्या मार्गदर्शनात रेशीम शेती हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर शाश्वत आणि कमी कालावधीत बारमाही उत्पन्न मिळवून देणारा जोडधंदा किंवा मुख्य व्यवसाय असल्याचे सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नंदुरबार
शंकर किरवे यांनी कृषि पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासनाकडून रेशीम शेतीला (तुती लागवड व संगोपन) मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे असे यावेळी मार्गदर्शनात माहिती दिली. सहयोगी अधिष्ठाता कृषि महाविद्यालय नंदुरबार डॉ. यू. बी. होले यांनी सध्याच्या बदलत्या हवामानात पारंपारिक पिकांना येणारा खर्च आणि त्या तुलनेत हाती येणारे अनिश्चित उत्पन्न मिळताना दिसून येते. अशा वेळी रेशीम शेती हा शेतकऱ्यांसाठी एक शाश्वत, भरघोस आणि हमखास उत्पन्न मिळवून देणारा पर्याय ठरत असून ती आजच्या काळाची मुख्य गरज बनली आहे. प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार दीपक पाटील यांनी आत्मा विभागाच्या माध्यमातून रेशीम शेतीसाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण नियोजन करू शकतो अशी माहिती दिली. कार्यक्रमात उपस्थित मान्सवरांच्या हस्तेरेशीम शेती घडीपात्रिका प्रकाशित करण्यात आली.
तसेच माजी रेशीम विकास अधिकारी नाशिक पोपट इंगळे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला, डी. बी. इंगळे, रेशीम विकास अधिकारी, नाशिक यांनी रेशीम शेती नोंदणी, विविध शासकीय योजना व अनुदान याविषयी माहिती दिली. कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकरी कृषि अधिकारी, कर्मचारी व रेशीम उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार संदीप कुवर यांनी केले.
तांत्रिक सत्रात सौ. सीमा पाटील रेशीम उद्योजक, चाळीसगाव यांनी रेशीम शेती तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यात जमीन, लागवड, संगोपन गृह, अंडीपुंज, कोष काढणी याबद्दल माहिती देतरेशीम शेती व्यवसायात संगोपनगृहाची स्वच्छता निर्जंतुकीकरण या बाबी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. चॉकीची पोच दिल्यानंतर संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्यासाठी फॉर्मेलिन, ब्लिचिंग पावडर तसेच अन्य शिफारशीत घटकांचा वापर करून संगोपनगृह तसेच ट्रेचे निर्जंतुकीकरण केले जाते अशी माहिती उपस्थित शेतकर्याना दिली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बल्लाळ गणेश देवस्थान प्रभानवल्ली येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
July, 30 2026
*आदर्श जि.प.शाळा तारळ,धुमाळवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप*
July, 30 2026
*एसआयआर मोहिमेंतर्गत वैजाली येथे विशेष शिबिर; मतदार पडताळणी व डिजिटायझेशनला वेग*
July, 30 2026
*नटावदकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी गुरूंना केले अभिवादन*
July, 30 2026
*शेतकरी कर्जमुक्ती योजना थकबाकीच्या रकमेत फरक असल्यास पोर्टलवरील रक्कमच ग्राह्य धरणार*
July, 30 2026

थोडक्यात बातमी

*बल्लाळ गणेश देवस्थान प्रभानवल्ली येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
July, 30 2026
*आदर्श जि.प.शाळा तारळ,धुमाळवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप*
July, 30 2026
*एसआयआर मोहिमेंतर्गत वैजाली येथे विशेष शिबिर; मतदार पडताळणी व डिजिटायझेशनला वेग*
July, 30 2026
*नटावदकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी गुरूंना केले अभिवादन*
July, 30 2026
*शेतकरी कर्जमुक्ती योजना थकबाकीच्या रकमेत फरक असल्यास पोर्टलवरील रक्कमच ग्राह्य धरणार*
July, 30 2026

थोडक्यात बातमी

*बल्लाळ गणेश देवस्थान प्रभानवल्ली येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
July, 30 2026
*आदर्श जि.प.शाळा तारळ,धुमाळवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप*
July, 30 2026

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज