*नटावदकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी गुरूंना केले अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नटावदकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी गुरूंना केले अभिवादन*
*नटावदकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी गुरूंना केले अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकलव्य विद्यालय व ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात आज विद्यार्थ्यांनी गुरूंना अभिवादन करण्यासाठी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महर्षी व्यास मुनी व देवी सरस्वती यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य धर्मेंद्र मराठे, प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ. गिरीश पवार व पर्यवेक्षक टिका पाडवी उपस्थित होते .गुरुमंत्राने सर्व विद्यार्थांनी गुरूंना वंदन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरी बैरागी हिने केले. गुरुपौर्णिमा का साजरी करावी याबाबतीत तिने आपले मनोगत प्रास्ताविकेत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. निधी जोशी, प्रणाली पानपाटील, अक्षरा साळी, जयेश कुलकर्णी व विश्वदीप जोगी यांनी गुरुप्रती असणाऱ्या त्यांच्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या. सत्काराला उत्तर देताना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सीए कृष्णा गांधी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गुरु केवळ विद्यार्थ्यांना दिशा देत नाही तर तो संरक्षक सुद्धा असतो.शिष्यांच्या कठीण परिस्थितीत कायम पाठीशी उभे राहतो आणि याच कारणामुळे गुरुशिष्यांचे नातं हे प्राचीन काळापासून अजरामर आहे. कार्यक्रमाचा समारोप करताना प्रा. वर्षा घासकडबी ह्यांनी गुरूंना आपल्या जीवनात आयुष्यभर गुरुस्थानी मानले तर विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल राहील असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी बैरागी तर आभार प्रदर्शन अश्विनी पाटील हिने केले. कार्यक्रमासाठी अक्षरा भोई व चेतना माळी यांनी फलक लेखन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक वृद्धांचे सहकार्य लाभले.



