*ज्येष्ठ कबड्डीपटू अशोक शिंदे यांचा सन्मान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ज्येष्ठ कबड्डीपटू अशोक शिंदे यांचा सन्मान*
*ज्येष्ठ कबड्डीपटू अशोक शिंदे यांचा सन्मान*
चिपळूण(प्रतिनिधी):-प्रसिद्ध कबड्डी समालोचक तथा भारतीय रेल्वे कबड्डी संघाचे प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी यांच्या शुभहस्ते बँक ऑफ महाराष्ट्र, मुंबई तसेच दसपटी विभाग क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ कबड्डीपटू पेढांबे गावचे सुपुत्र अशोक नारायण शिंदे यांचा त्यांच्या मुंबई निवासस्थानी नुकताच सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. कबड्डी क्षेत्रातील प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाबद्दल शिंदे यांचा हा सन्मान करण्यात आला. त्यांच्या क्रीडा कारकिर्दीने अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा दिली असून, कबड्डी क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय मानले जाते. या सन्मान सोहळ्यास शंकर शिंदे तसेच सुधाकर कदम उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.



