ताजा खबरे:
*ज्येष्ठ कबड्डीपटू अशोक शिंदे यांचा सन्मान*
*ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या आषाढी दिंडी सोहळ्यास भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*बल्लाळ गणेश देवस्थान प्रभानवल्ली येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
*आदर्श जि.प.शाळा तारळ,धुमाळवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप*
*एसआयआर मोहिमेंतर्गत वैजाली येथे विशेष शिबिर; मतदार पडताळणी व डिजिटायझेशनला वेग*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*एसआयआर मोहिमेंतर्गत वैजाली येथे विशेष शिबिर; मतदार पडताळणी व डिजिटायझेशनला वेग*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*एसआयआर मोहिमेंतर्गत वैजाली येथे विशेष शिबिर; मतदार पडताळणी व डिजिटायझेशनला वेग*

  • Share:

*एसआयआर मोहिमेंतर्गत वैजाली येथे विशेष शिबिर, मतदार पडताळणी व डिजिटायझेशनला वेग*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वैजाली येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मतदारांच्या सक्रिय सहभागामुळे मतदार पडताळणी व डिजिटायझेशनचे काम समाधानकारक गतीने सुरू असून अभियान प्रगतीपथावर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली, नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बी. ए. कापसे तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. डिजिटलायझेशनचे काम निर्धारित मुदतीत आणि अचूक पद्धतीने पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी सूचना दिल्या असून, त्याचा नियमित आढावा उपजिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला जात आहे.
अभियानासाठी सहाय्यक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हरी बागुल, सुनील भामरे तसेच बीएलओ असिस्टंट गोपाल गावित, माधुरी परमवाल, प्रशांत पाटील आणि गजानन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून मतदारांची ओळख पडताळणी, प्रगणना फॉर्म भरून घेणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि त्याचे डिजिटायझेशन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मतदारांना दोन प्रतींमध्ये प्रगणना फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले असून भरलेले फॉर्म, छायाचित्रे व आवश्यक कागदपत्रांची पडताळणीही केली जात आहे.
वैजाली गावातील एकूण 2343 मतदारांपैकी आजअखेर 1650 मतदारांचे फॉर्म डिजिटायझेशन पूर्ण झाले असून 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम हाती घेतली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व त्यांच्यासोबत नियुक्त प्रतिनिधी घरोघरी भेट देत नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करत असल्याने अभियानाला अपेक्षित वेग मिळत आहे.
विशेष मोहिमेत बीएलओ सुपरवायझर तथा प्रकाशा केंद्रप्रमुख मनोज पिंजारी, बीएलओ सुनील भामरे, हरी बागुल, सहाय्यक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी गोपाल गावित, प्रशांत पाटील, गजानन पाटील, माधुरी परमवाल तसेच तलाठी दिपांजली पावरा हे प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यरत आहेत. गावातील वाडी-वस्तीपर्यंत पोहोचून नागरिकांना मतदार पडताळणीचे महत्त्व समजावून सांगितले जात असून त्यामुळे ग्रामीण भागातूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, शाळेतील अध्यापनाचे काम सुरळीत सुरू ठेवत शिक्षक बीएलओ म्हणून आपली जबाबदारीही प्रभावीपणे पार पाडत आहेत. शैक्षणिक कामकाजात कोणताही अडथळा न आणता ते नियमितपणे घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करत असल्याने नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणी साठी वैजालीच्या सरपंच सुरेखा ठाकरे, उपसरपंच डॉ. जगदीश पाटील, ग्रामविकास अधिकारी हरिश्चंद्र नुक्ते, कृषी अधिकारी योगेश मिस्त्री तसेच नानकू ठाकरे, योगेश पाटील, समाधान पाटील, संदीप पाटील, गणेश पाटील, बुधा पाटील, विलास मोरे, भगवान पाटील, विकी मोरे, पुंडलिक पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी सक्रिय सहकार्य केले आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत राबविण्यात येणारे हे विशेष सखोल पुनरीक्षण अभियान कालबद्ध स्वरूपाचे असून सर्व प्रक्रिया निश्चित मुदतीत पूर्ण करणे अनिवार्य आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह सहकार्य करून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवावा, तसेच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. "जागरूक मतदार, सक्षम लोकशाही" या संदेशासह मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून वैजाली येथील अभियान त्याचे प्रभावी उदाहरण ठरत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ज्येष्ठ कबड्डीपटू अशोक शिंदे यांचा सन्मान*
July, 30 2026
*ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या आषाढी दिंडी सोहळ्यास भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
July, 30 2026
*बल्लाळ गणेश देवस्थान प्रभानवल्ली येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
July, 30 2026
*आदर्श जि.प.शाळा तारळ,धुमाळवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप*
July, 30 2026
*एसआयआर मोहिमेंतर्गत वैजाली येथे विशेष शिबिर; मतदार पडताळणी व डिजिटायझेशनला वेग*
July, 30 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज