ताजा खबरे:
*निःपक्षपाती काम, सोशल मीडियावर लक्ष अन् कायदा- सुव्यवस्थेला प्राधान्य-अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.अजय देवरे*
*गुरुपौर्णिमेनिमित्त मिशन हायस्कूलमध्ये शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडून भावपूर्ण सत्कार*
*पवनचक्कीवरील अपघातात ज्युनिअर इंजिनियर गौरवसिंग गिरासे यांचा दुर्दैवी मृत्यू*
*आष्टे येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात, गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*निःपक्षपाती काम, सोशल मीडियावर लक्ष अन् कायदा- सुव्यवस्थेला प्राधान्य-अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.अजय देवरे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*निःपक्षपाती काम, सोशल मीडियावर लक्ष अन् कायदा- सुव्यवस्थेला प्राधान्य-अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.अजय देवरे*

  • Share:

*निःपक्षपाती काम, सोशल मीडियावर लक्ष अन् कायदा- सुव्यवस्थेला प्राधान्य-अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.अजय देवरे*
शिरपुर(प्रतिनिधी):-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटीलांनी कोणत्याही राजकीय प्रभावापासून अलिप्त राहून निःपक्षपातीपणे कर्तव्य बजावावे, सोशल मीडियावरील वादग्रस्त, भडकाऊ व अफवाजन्य संदेशांवर सतत लक्ष ठेवून संशयास्पद बाबींची तातडीने पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी तसेच गावागावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून दक्षतेने काम करावे, असे मार्गदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी केले. थाळनेर पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी डॉ. देवरे यांनी दोन दिवसीय दौऱ्यांत दि. 29 व 30 जुलै रोजी पोलीस ठाण्यास भेट दिली. पहिल्या दिवशी अधिकारी व अंमलदार यांच्या दप्तरांची तपासणी करण्यात आली, तर दुसऱ्या दिवशी परेड, मॉक ड्रिल, गॅस गन व गॅस सेलच्या वापराबाबत मार्गदर्शन, पोलीस ठाण्यातील अभिलेखांची पाहणी तसेच पोलीस पाटील बैठक घेण्यात आली. यावेळी थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल तसेच थाळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.
पोलीस पाटील बैठकीत डॉ. देवरे यांनी प्रत्येक पोलीस पाटलाकडून त्यांच्या गावातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, संवेदनशील प्रश्न, सामाजिक सलोखा, गुन्हेगारीची परिस्थिती तसेच स्थानिक स्तरावरील विविध घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला. गावपातळीवर शांतता, सामाजिक ऐक्य आणि नागरिकांचा विश्वास टिकवून ठेवण्यात पोलीस पाटलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विशेष उल्लेख करत त्यांनी पोलीस पाटीलांनी कोणत्याही पक्ष, गट किंवा व्यक्तीच्या प्रभावाखाली न येता केवळ कायदा व नियमांच्या चौकटीत राहून निष्पक्षपणे जबाबदारी पार पाडावी, असे सांगितले. निवडणुकीच्या काळात गावातील वातावरण शांत व विश्वासार्ह राहण्यासाठी पोलीस पाटलांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे समाजात गैरसमज, अफवा किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामसह विविध माध्यमांवरील वादग्रस्त, आक्षेपार्ह अथवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अशा प्रकारची कोणतीही बाब निदर्शनास आल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याला माहिती देऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सक्रिय सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सर्व अधिकारी व अंमलदारांचा दरबार घेऊन त्यांच्या अडी- अडचणी जाणून घेण्यात आल्या. काही समस्या तत्काळ त्यांच्या स्तरावर निकाली काढत उर्वरित बाबींवर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना डॉ. देवरे यांनी दिल्या. यानंतर पोलीस पाटील बांधवांच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, प्रभारी अधिकारी हेमंत पाटील तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात पिंप्रीचे पोलीस पाटील जयपालसिंह गिरासे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "गावातील शांतता ही केवळ पोलीस यंत्रणेची जबाबदारी नसून ती ग्रामस्थ, पोलीस पाटील आणि पोलीस प्रशासन यांच्या परस्पर विश्वासावर उभी असते. प्रत्येक पोलीस पाटील हा आपल्या गावाचा सजग प्रहरी म्हणून कार्य करत असतो. बदलत्या काळात सोशल मीडियामुळे आव्हाने वाढली असली तरी जनतेचा विश्वास, वस्तुनिष्ठ माहिती आणि तात्काळ समन्वय हीच कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची खरी ताकद आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततापूर्ण, पारदर्शक आणि निःपक्षपाती वातावरणात पार पाडण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करू," अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या नियोजन व यशस्वी आयोजनासाठी गोपनीय शाखेचे हवालदार दिनेश महाले, प्रभारी रायटर उमाकांत वाघ, गुन्हे शाखेचे रवींद्र मोरे, हजेरी मेजर रावसाहेब पाटील, बारनिशी ललिता पाटील, लेखनिक अंमलदार विजय पाटील तसेच थाळनेर पोलीस ठाण्यातील सर्व बीट अंमलदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*निःपक्षपाती काम, सोशल मीडियावर लक्ष अन् कायदा- सुव्यवस्थेला प्राधान्य-अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.अजय देवरे*
July, 30 2026
*गुरुपौर्णिमेनिमित्त मिशन हायस्कूलमध्ये शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडून भावपूर्ण सत्कार*
July, 29 2026
*पवनचक्कीवरील अपघातात ज्युनिअर इंजिनियर गौरवसिंग गिरासे यांचा दुर्दैवी मृत्यू*
July, 29 2026
*आष्टे येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात, गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
July, 29 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
July, 29 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज