*माजी सैनिक, वीरनारी व त्यांच्या पाल्यांसाठी 'विशेष गौरव पुरस्कार' जाहीर, 10 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माजी सैनिक, वीरनारी व त्यांच्या पाल्यांसाठी 'विशेष गौरव पुरस्कार' जाहीर, 10 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*
*माजी सैनिक, वीरनारी व त्यांच्या पाल्यांसाठी 'विशेष गौरव पुरस्कार' जाहीर, 10 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी सैनिक, युद्ध विधवा (वीरनारी), विधवा, त्यांच्या पत्नी व पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सैनिक कल्याण विभागाच्या वतीने 'विशेष गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज/प्रस्ताव 10 सप्टेंबर 2026 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (डॉ.) निलेश प्रकाश पाटील (नि.) यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. पुरस्काराचे स्वरूप व निकष: क्रीडा व सांस्कृतिक/सामाजिक/शौर्य क्षेत्र: राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार विजेते. संगीत, गायन, वादन, नृत्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी.
यशस्वी उद्योजक किंवा संगणक (IT) क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणारे. पूर, आग, दरोडा, अपघात व इतर नैसर्गिक आपत्तींमध्ये शौर्य/बचावकार्य करणारे किंवा देश व राज्याची प्रतिष्ठा वाढवणारे लक्षणीय काम करणारे. पुरस्कार रक्कम: राष्ट्रीय स्तर: रुपये 25 हजार आंतरराष्ट्रीय स्तर: रुपये 50 हजार, उच्च शिक्षण प्रवेश (IIT/IIM/AIIMS):, आयआयटी (IIT), आयआयएम (IIM), एआयआयएमएस (AIIMS) यांसारख्या देशातील नामांकित संस्थांमध्ये शैक्षणिक प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी. पुरस्कार रक्कम: रुपये 01 लाख (एकरकमी) शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार (शैक्षणिक वर्ष 2025-26): इयत्ता 10 वी: 90 टक्के पेक्षा जास्त गुण, इयत्ता 12 वी: 85 टक्के पेक्षा जास्त गुण, पुरस्कार रक्कम: रुपये 20 हजार (एकरकमी) विद्यापीठ प्राविण्य: पदवी (Graduation) किंवा पदव्युत्तर (Post-Graduation) अभ्यासात विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावणारे विद्यार्थी. पुरस्कार रक्कम: रुपये 25 हजार (एकरकमी)
निवड प्रक्रिया व अंतिम मुदत:
प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्याकडे अंतिम निवडीकरिता पाठविण्यात येईल. अंतिम निवड झालेल्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (डॉ.) पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



