*अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांना 'स्टँड अप इंडिया' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांना 'स्टँड अप इंडिया' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत*
*अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांना 'स्टँड अप इंडिया' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत*
नंदुरबार(प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत केंद्र शासनाची 'स्टँड अप इंडिया' योजना अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील 18 वर्षांवरील पात्र नवउद्योजकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक नवउद्योजकांनी 31 ऑगस्ट 2026 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय (दिनांक 27 मार्च 2026) नुसार केंद्र शासनाने स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत निकषांची व्याप्ती वाढवून सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. पात्र नवउद्योजकांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता लक्षात घेता, लाभार्थ्यांना केवळ 10 टक्के स्व- हिस्सा भरावा लागणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेने 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के रक्कम राज्य शासनामार्फत अनुदान (सबसिडी) म्हणून दिली जाईल.
जिल्ह्यातील पात्र व इच्छुक नवउद्योजकांनी आवश्यक विहीत कागदपत्रांसह आपले अर्ज 31 ऑगस्ट 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे जमा करावेत, असेही सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.