*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे शालेय आरोग्य तपासणी संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे शालेय आरोग्य तपासणी संपन्न*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे शालेय आरोग्य तपासणी संपन्न*
तळोदा(प्रतिनिधी):-माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे
शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य तपासणी अधिकारी डॉ. वंदना बडगुजर व त्यांच्या पथकाने शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. तसेच किरकोळ आजार असलेल्या विद्यार्थ्याना तेथेच औषधोपचार करण्यात आले. सदर आरोग्य तपासणीला
विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहून डॉ. वंदना बडगुजर व त्यांच्या पथकाने समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक उमेश पाटील यांनी डॉ. वंदना बडगुजर व त्यांच्या पथकाचे
शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले या आरोग्य तपासणी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



