*अक्कलकुवा वृक्षतोड प्रकरणाला वेगळे वळण; ती वृक्षतोड नव्हती,तक्रारदारांनीच वनविभागासमोर दिला लेखी खुलासा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा वृक्षतोड प्रकरणाला वेगळे वळण; ती वृक्षतोड नव्हती,तक्रारदारांनीच वनविभागासमोर दिला लेखी खुलासा*
*अक्कलकुवा वृक्षतोड प्रकरणाला वेगळे वळण; ती वृक्षतोड नव्हती,तक्रारदारांनीच वनविभागासमोर दिला लेखी खुलासा*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मौजे कुवा (अंधारबारी पाडा) शिवारात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याच्या तक्रारीला आता एक संपूर्ण वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणी तक्रार करणाऱ्या गावकऱ्यांनीच आता वन विभागासमोर प्रत्यक्ष जागेची पाहणी केल्यानंतर आपला आधीचा दावा चुकीचा असल्याचा लेखी जबाब दिला आहे. गोळा केलेल्या जळाऊ लाकडांच्या फोटोंच्या आधारे आणि सत्य परिस्थितीची खातरजमा न करताच घाईघाईत हा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता, अशी कबुली खुद्द तक्रारदारांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कं. नं. 154 मधील दावेदार रामजा कोसल्या वसावे (रा. गोरजाबारी, ओहवापाडा) यांच्या विरोधात गावकऱ्यांनी वनक्षेत्र कार्यालयात वृक्षतोडीचा अर्ज दाखल केला होता. या अर्जाची गंभीर दखल घेत वनविभागाच्या पथकाने तक्रारदारांसह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन संयुक्त पाहणी केली. या तपासणी दरम्यान सदर भागात कोणत्याही प्रकारची नवीन किंवा ताजी वृक्षतोड झाली नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधित इसम केवळ त्याच्या पात्र अतिक्रमण क्षेत्राला लागून क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करत होता आणि तिथे फक्त जळाऊ लाकूड जमा केलेले होते. अफवेमुळे व चुकीच्या फोटोंच्या आधारे हा गैरसमज झाला असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले.
या प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी आणि चौकशी करण्यासाठी वनविभागाचे विशेष पथक तैनात करण्यात आले होते. यामध्ये वनपाल श्रीमती एल. आर. खुरसे (कोठली), वनरक्षक श्रीमती लक्ष्मी पावरा (कोठली), वनरक्षक श्रीमती ओपना पाडवी (ओघाणी), शांतीलाल अहिरे (वनपाल वालंबा), रामदास वैरांगी (वनरक्षक गोरजाबारी), अमित पाडवी (वनरक्षक) आणि विजया वसावे (वनरक्षक) या सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन चौकशी व सखोल पाहणी केली. या वरिष्ठ व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि प्रत्यक्ष पाहणीनंतर तक्रारदार धोना रामा वसावे, राम्या रामा वसावे व इतर पंचांनी वनपाल कोठली यांच्या समक्ष आपला सत्य जबाब लिहून दिला आहे. कोणत्याही प्रकारची अवैध वृक्षतोड झाली नसून हा अर्ज चुकीच्या माहितीच्या आधारे दिला गेल्याचे त्यांनी मान्य केले आहे. वनविभागाच्या या संपूर्ण पथकाने वेळेत घटनास्थळी पोहोचून दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्यामुळे, गेल्या दोन दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या उलट -सुलट चर्चांना आणि वनविभागावरील आरोपांना आता पूर्णविराम मिळाला आहे.



